पहाटे पहाटे पाउलांना दवबिंदूंचा स्पर्श झाला
तृष्णे चा मम पाउलांना प्रथमच अनुभव आला
तृष्णा पाउलांना असते,होते ठाऊक कुणास
बनांत पाउलांना तृणांचे दवबिंदू पिण्याची आस
पायवाटे ने निघाली पाऊले कुठवर आत बनांत
दवबिंदूं ची आस नेईल त्यांना दुर कुठवर बनांत
पहा ते सुर्यबिंब प्राचीस क्षितिजावर उगवत
मोत्यांचे दव बिंदू हळुवार हवेत विरून जात
नकळत माझ्या झाली ही जादू कशी काय
बनांत अवचित आता उरले एकटेच माझे पाय
गुरुवार , १४/०३/२०२४ , ०७:५२ PM
अजय सरदेसाई ( मेघ )
No comments:
Post a Comment