प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Tuesday, 12 March 2024

आता कुठे मी शब्दांचे बोट पकडून..............


आता कुठे मी शब्दांचे बोट पकडून चालायला शिकतो आहे

शब्दांची नी माझी अजुन तेवढी ओळख कुठे झाली आहे

शब्द इतक्या सहजी नवख्यांशी मैत्री करत नाहीत

वाऱ्याला सुद्धा नवकवींच्या शब्द उभे राहत नाहीत

अलीकडेच कुठे शब्द माला हात पकडू देत आहेत

आता कुठे ते मला त्यांच्या सर्कल मध्ये घेत आहेत

अजुन ही मला बरीच मोठी मजल मारायची आहे

शब्दांच्या विआयपी सर्कल मध्ये मला पण एन्ट्री घ्यायची आहे

जिथे बसले प्रसिद्ध कवी मला त्या पंगतीत एकदा बसायचे आहे

कवितेच्या आकाशांत चमचमणारे मोठ-मोठे तारे आहेत

गदी ,बाकी, पाडगावकरां सारखे किती मोठे सारे आहेत

त्यांच्या समोर मी म्हणजे सुर्या समोर जणू एक काजवा

या शब्दांनो या , येऊन माझी शब्दसंपदा वाढवा

शब्द जर असतील मोती तर मी आहे एक पाणबुड्या
समुद्रात उतरून मी आणतो शब्द मोती मारुन खोल उड्या

मंगळवार, १२/०३/२०२४ , ०९:२१ PM

अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment