प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Tuesday, 26 March 2024

मिट्ट काळोखात


 

मिट्ट काळोखात ही एक उजेड बिंदू दिसतो आहे

निराशेत ह्या आशेचा किरण एक कुठुन उठला आहे

वैषम्य नाही की माझ्या वाट्याला फक्त दुःख आले

आश्चर्य हे की वाट्याला काही आनंदाचे क्षण मिळाले 

हृदया रुतले काटे तरी ओठांवर स्मितहास्य आहे

दुःख बोचरे,तरी ओठांवर माझ्या आनंद गाणे आहे

तू दिलेल्या जखमांना मी अजुन जपले आहे

फुंकर हुळ घाल जरा,अजून रक्त रिसत आहे

तुझे ईप्सित नवे, स्वप्न नवे,मिळाल्या नवीन वाटा

मी कवटाळून त्या जुन्या भावना, तिथेच पडलो आहे

 

मंगळवार , २६/०३/२०२४  , ०३:४० PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment