प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 28 March 2024

अनोळखी सावल्या


 

एकांतात दुरुन बोलावी कोण मला

सावल्या कुणाच्या खुणावतात मला

गुप्प अंधार,आणि दुसरे ना काहीच

त्या गडदांत सुद्धा कोण दिसे मला

मन बेचैन, भीतीने दाटले रोमांच

सुर भयाण निरंतर ऐकु येती मला

ते डोळे मजवर सतत नजर ठेवून

काळोखातून वटारत असती मला

सांगा कुणी तरी कोण ते अनोळखी

ज्यांची ओळख वाटते नकोशी मला

 

गुरुवार , २८/०३/२०२४ ,  ०४:२७ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment