ठेवून बघ शिंपल्यात मनाच्या तू जपुन तुझ्या स्मृती।
स्मृतीं चे त्या तुझ्या ही नकळत होतील सुंदर मोती।।
मोत्यांची त्या तु गुंफ एक सुंदर अलवार माळ।
डोळ्यां पुढून सरकत जाईल हळूच भुतकाळ।।
मोती ते तुझ्या आठवांचे तू पुन्हा ठेव अलगद जपुन।
ह्या वेळी मात्र हृदयाच्या शिंपल्यात ठेव ते लपवुन।।
ह्या मोत्यांचे रंग निराळे शुभ्र,निळे काळे नी पिवळे।
ज्या स्मृतींची जशी जातकुळी तैसेची त्यांना रंग मिळाले।।
काही स्मृती सांडल्या शिंपल्यांतून, हरवले अनमोल मोती।
घडले कसे हे मला ही न कळले, तुटली माळ विखुरले मोती।।
मंगळवार, १२/०३/२०२४ , ०६:२६ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment