तुझ्या आठवांचे ते विरह गीत माझे।
डोळ्यांत अश्रु,ओठांवर स्मित माझे
रणरणत्या ऊन्हात चालती पाऊले माझी ।
सांग सखे दाखवू कोणास हे दुःख माझे ।।
त्या उंच शिखरांच्या पलीकडे।
आहे एकटेच ते झोपडे माझे।।
हसले सर्व आसवांस माझ्या ।
परी कुणा न दिसले घाव माझे।।
जल धारा मेघांतून बरसल्या।
तरी शुष्क का ओठ माझे।।
स्वप्न पहात नाही मी आता।
छाटले
कुणी तरी पंख माझे।।
मंगळवार , २६/०३/२०२४ , ०६:१० PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment