प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday, 16 October 2026

ऑमलेट - पाव


 


तापल्या तव्यावर अंड्याचा थाट,
कांदा-मिरची-कोथिंबिरीचा खमंग घमघमाट!

पिझ्झाचा ना तोरा हवा, ना बर्गरचा मान,
ऑम्लेट-पावापुढे त्यांची, फिकी पडते शान!

कटिंग चहाची साथ आणि, गप्पांचा फड,
एका घासात विसरवतो, टेन्शन सगळं जड!

खिशाला ना भार, ना कसला दिखावा,
रस्त्यावरच्या गाडीवर, चवीचा विसावा!

मध्यरात्री भूक लागो, वा सकाळची वेळ,
ऑम्लेट-पाव दिसताच, जमतो मनाचा मेळ!

अंडं-पावाचं नातं जणू, जन्मोजन्मीचं प्रेम,
एकदा चाखा राव, मग रोजचाच नेम!

शुक्रवार, १६/१०/२०२६ , ८:०० PM
अजय सरदेसाई -मेघ



Sunday, 11 October 2026

शेतकऱ्याची गाथा


अरं देवा, ही आपदा का टळना?
पेरलं व्हतं मातीत... पण काहीच का उगवना.

वैशाखाच्या वणव्यात धरती करपून गेली,
आता ज्येष्ठ आला, तरी पावसाचा येक थेंब न्हाय ना!

भेगा पडल्या रानास, भेगा पडल्या म्हाज्या हातास,
कुठं चुकलं माझं देवा? मला कायबी कळं ना.

बियाणं पेरलं,ते जळून गेलं, अंकुर येक फुटं ना,
असा रं कसा मी अभागी, अजून उलगडा व्हई ना.

बायकुला काय सांगू, पोरांस्नी काय सांगू,
यंदा दसरा-दिवाळी न्हाई, कारण कापणीच न्हाई व्हणार ना!

वरुणराजा, तू ऐकलं माझं, पाऊस बी आला रानात,
पण असा कोसळला की, वाहून गेलं समदं क्षणांत.

इकडं आड, तिकडं विहीर, आपल्याच वाट्याला असं का?
तू बरस की नको बरसू, बळीराजाचंच मरण का ?

देवा, अरे... माझी कळ तुला कशी समजंना?
तू हायेस का रं त्या आभाळात, का मुळी ना ?

आभाळातला बाप म्हणून तुझ्याकडं बघायचं,
आता बापच न्हाई म्हणल्यावर, तुझं श्राद्ध का उरकून घ्यायचं?

रविवार, ११/१०/२०२६ , २:१० PM
अजय सरदेसाई -मेघ

Saturday, 10 October 2026

मेरी कविताएं

 



रंगों से बनाई हुई तस्वीरें, मेरी कविताएँ हैं,
लफ़्ज़ मिरे रंग और कविताएँ मिरी तस्वीरें हैं।
Pictures painted with countless colours are my poems;
My words are the colours, and my poems are the pictures.
कभी धूप बनकर उतरती हैं दिल के आँगन में,
कभी छाँव में भीगती हुई तहरीरें हैं।
Sometimes, they descend into the courtyard of my heart as sunlight;
Sometimes, they are written words drenched in the coolness of shade.
कभी ख़्वाब बनकर पलकों पे ठहर जाती हैं,
कभी नींद से दूर ले जाती तदबीरें हैं।
Sometimes, they linger upon my eyelids as dreams;
Sometimes, they become pursuits that carry me far away from sleep.
किसी रंग में ढलता है दर्द जुदाई का,
किसी रंग में मोहब्बत की जागीरें हैं।
In one shade, the pain of separation takes shape;
In another, lie the treasured realms of love.
मैं ख़ाली सफ़ों पर जो एहसास लिखता हूँ,
वो वक़्त के चेहरे पर उभरती लकीरें हैं।
The emotions I write upon blank pages
Become lines etched upon the face of time.
कभी अश्क़ बनकर मेरी आँखों से बहती हैं,
कभी होंठों पे ठहरी हुई तक़रीरें हैं।
Sometimes, they flow from my eyes as tears;
Sometimes, they become eloquent speeches resting upon my lips.
हर शेर में छुपा है कोई अक्स ज़िंदगी का,
ये मेरी नहीं, मेरे दौर की ताबीरें हैं।
Hidden within every couplet is a reflection of life;
These are not merely mine, but interpretations of my age.
मैं रंग चुनूँ तो कहाँ तक चुनूँ ऐ दुनिया,
मेरे ख़यालों में बिखरी हुई तासीरें हैं।
How many colours can I possibly choose, O world?
My thoughts are scattered with impressions that each bear their own influence.
जो पढ़ सके ख़ामोशी, वो समझेगा मुझको,
मेरी ग़ज़ल के लफ़्ज़ भी गहरी तफ़सीरें हैं।
Whoever can read silence will understand me;
Even the words of my ghazal are profound interpretations.

My words are colours, my poems are pictures,
and my silence holds the meanings yet unseen.

रविवार, ११/९/२०२६ , १०:१० PM 
अजय सरदेसाई ‘मेघ’

Friday, 9 October 2026

दिवाना तेरा



 

ये दीवानगी मेरी फ़ितरत में नहीं,
तेरी आरज़ू ने ही इसे है उभारा,
यूँ तो मैं हमेशा "फंटूश" कहलाता रहा,
आज हर नज़र में हूँ, बस दीवाना तेरा।

न चाँद की चाहत, न सितारों की तलब,
तेरी गली ही बस ठिकाना हो मेरा,
पूछे गर कोई जो मुझसे पहचान मेरी,
मैं कहूँगा बस इतना, हूँ दीवाना तेरा।

तेरी एक नज़र से हुआ है ये असर,
ख़्वाबों में हूँ, न जागा शामो-सहर,
दुनिया की भीड़ में भी हूँ सबसे जुदा,
बस एक ही नाम मेरा, दीवाना तेरा।

बुधवार, ८/१०/२६ , १२:३७ PM
अजय सरदेसाई -मेघ

Monday, 28 September 2026

गायत्री: मग्नं त्वयि



हृदयं मम लीनं हि प्रेम्णा त्वयि,

नयनं मम मग्नं हि स्वप्ने त्वयि।

(हृदय माझे विरघळले तुझ्याच प्रेमात,

डोळेही हरवले तुझ्याच स्वप्नांत।)


न कदापि मया त्वां विस्मर्तुं शक्यते,

मम प्राणगतिः सर्वदा त्वयि।

(तुला विसरणे मला कधीच शक्य नाही,

माझ्या श्वासांची प्रत्येक लय तुझ्याच ठायी।)


मृदुगन्धवहः स्नेहवायुः स्पृशन्,

मम चेतसि जागर्ति कामो त्वयि।

(स्नेहाचा मंद सुगंधी वारा जेव्हा स्पर्शून जातो,

मनात माझ्या तुझ्यासाठीचा प्रेमभाव जागा होतो।)


वियुक्ते त्वया शून्यमेवाम्बरं,

निशा दीर्घतरा याति नित्यं त्वयि।

(तुझ्याविना आभाळही वाटते अगदी रिते,

तुझ्या विरहात रात्रही संपत नाही कधीच रे।)


न शब्दैर्न गीतैर्न मौनैरपि,

मम प्रेम्णः सीमा हि ज्ञाता त्वयि।

(शब्दांनी ना गीतांनी, ना अबोल मौनांनी,

माझ्या प्रेमाची व्याप्ती कळेल कशी तुला सांगूनी?)


त्वमेव मम स्वप्नमस्ति प्रिये,

त्वमेव मम जीवनं च त्वयि।

(तूच माझे स्वप्न आहेस, तूच माझी प्रिये,

तुझ्यातच माझे जीवन, तुझ्यातच सारे जिये।)


यदि जन्म पुनर्जन्म वा प्राप्नुयां,

मम प्रेम पुनः स्यात् तदेव त्वयि।

(जन्म पुन्हा मिळो, पुनर्जन्म कितीही येऊ दे,

माझे प्रेम प्रत्येक जन्मी तुझ्यावरच राहू दे।)


मेघ इव स्नेहं वर्षति सर्वदा,

हृदि तस्य वासः केवलं त्वयि।

(मेघासम प्रेमाची बरसात होत राहते,

हृदयात मात्र तुझीच सावली सदैव राहते।)


रवीवार, २७/९/२६, ०१:२५ PM

अजय सरदेसाई - मेघ

Saturday, 26 September 2026

कवडसा



तावदानीतून प्रकाशाचा एक तिरपा कवडसा आला,
सकाळी मी भेटलो नाही, म्हणून बहुधा चालून आला।
मी उठलो की नाही, हेच पाहायला आला असेल,
निजल्या सकाळीला हलकेच जागवायला आला असेल।

त्याच्या मागे अगणित त्रसरेणू अनाहूत शिरले घरात,
तोच त्यांना घेऊन आला, कुठल्या वाटेने, कुणास ठाऊक आत!
काय त्याचा धिटपणा, न विचारता आत आला,
उपटसुंभासम शिरला, पाहुणे अनोळखी घेऊन आला।

कवडसा जरा रेंगाळला, भिंतीवरून सरकत गेला,
जणू घरभर फिरून पाहत, कोपरा न् कोपरा धुंडाळत गेला।
कोण कुठे झोपले अजुनी, कुणाची जागायची वेळ,
कुणाच्या पापणीवर अजुनी, स्वप्नांचा रेंगाळे खेळ।

त्रसरेणूंना नव्हती घाई, ते तरंगत राहिले तिथे,
त्याच्या अंगाखांद्यावर, जणू घरच होते त्यांचे तिथे।
जणू त्यांचाच संसार होता, त्यांचीच होती वस्ती,
त्या एका कवडशावर जणू, त्यांचीच अढळ सत्ता होती।

मी म्हणालो मनाशी—ह्याला हाकलावे की करावे स्वागत?
अनोळखी पाहुण्याला शेवटी, आपलेसे करावे कदाचित?
तोवर तो डोकावून गेला, टेबलावरच्या पेल्यात,
चहाची वाफ उठून आली, विसावली त्याच्या अंगात।

आणि मग कवडसा अन् वाफ, दोघे एकरूप झाले,
प्रकाश आणि ऊब क्षणभर, एकमेकांत विरघळले।
आता प्रश्न एवढाच उरला, उत्तर मात्र सापडेना—
चहा आधी गार झाला, की उजाडणे थांबले जरा?

शनिवार, २६/९/२६ , ५:०५ PM
अजय सरदेसाई -मेघ 

Thursday, 24 September 2026

बाकी आहे...




एक युग सरून गेले, भेट आपली होऊन,
हृदयात त्या दिवसांची आठवण बाकी आहे।

आता तुला मिळविण्याची इच्छा उरली नाही,
तरी तुझ्या भेटीची ओढ अजून बाकी आहे।

हळूहळू वयाचीही संध्याकाळ होत आहे,
तरी तुझे मनातून जाणे अजून बाकी आहे।

पुन्हा जन्म घ्यावा लागू नये, हीच भीती मनात,
कारण तुझ्या भेटीची आस अजून बाकी आहे।

कॉलेजच्या त्या दिवसांत आपण भेटत होतो,
त्या सुंदर दिवसांची स्मृती अजून बाकी आहे।

त्या काळाच्या काही सुंदर सौगाती जपल्या आहेत मी,
त्या सौगाती तुला परत करणे अजून बाकी आहे।

बुधवार, २३/९/२६, ७:३० PM
अजय सरदेसाई — मेघ

Wednesday, 23 September 2026

बाकी है...


 

एक ज़माना गुज़र गया हमको मिले हुए,
दिल में मगर अभी वो यादें बाकी हैं।

अब पाने की चाहत नहीं रही मगर,
तुमसे मिलने की आरज़ू बाकी है।

धीरे-धीरे उम्र अब ढल रही है मगर,
तेरा जाना दिल से अभी बाकी है।

डरता हूँ कि फिर से जन्म न लेना पड़े,
क्योंकि तुमसे मिलने की हसरत बाकी है।

हम कॉलेज में मिला करते थे, वो भी क्या ख़ूबसूरत दिन थे,
उन दिनों की कुछ सौग़ातें तुम्हें वापस करना बाकी है।

बुधवार, २३/९/२६ , ७:३० PM 
अजय सरदेसाई -मेघ

लिखकर दूॅं


तू कहे तो तेरे नाम मेरी ज़िंदगी लिखकर दूँ,
तू मेरी ज़िंदगी है, तुम्हीं को तुम्हें लिखकर दूँ।

सभी कुछ तेरा है, और मैं भी तो तुम्हारा हूँ,
अब इसके सिवा और क्या तुम्हें लिखकर दूँ।

ये ज़मीन ये आसमान ये वादियाँ हसीं तुम्हीं से हैं,
कहो तो एक बार क्या ये सभी तुम्हें लिखकर दूँ।

तस्कीन गर मुहब्बत में है तो वो तुम्हीं से है,
मुस्कुरा दो एक बार तो ये तस्कीन तुम्हें लिखकर दूँ।

तुम रब हो मेरे, तुम्हीं से वजूद है मेरा,
प्यार से देखो मुझे, तुम्हें ख़ुदा लिखकर दूँ।

'मेघ' कहते हैं मुझे, मुझसे बारिशों की रवानी है,
तुम रअद बन जाओ तो तुम्हें बरसात लिखकर दूँ

बुधवार, २३/९/२६ , ०१:०८ PM
अजय सरदेसाई -मेघ

रअद = बादल की गरज

Tuesday, 22 September 2026

दोस्ती


तू नज़र में न आए कहीं, इसलिए मैं मुड़ गया,
हमारी मुलाक़ात न हो, इसलिए मैं मुड़ गया।

दोस्ती की हसीं यादें अब भी ज़िंदा हैं दिल में,
वो कभी कड़वी न हो जाएँ, इसलिए मैं मुड़ गया।

आँखों में अचानक भर आए अनजाने आँसू,
तू उन्हें कभी न देखे, इसलिए मैं मुड़ गया।

अपनी दोस्ती इमली-बेरों जितनी पुरानी थी,
सूख गए वो पेड़ अब, इसलिए मैं मुड़ गया।

बचपन, स्कूल, कॉलेज कब के पीछे छूट गए,
पर आवाज़ तेरी गूँजे कानों में, इसलिए मैं मुड़ गया।

तेरी आँखों में आज दिखे कई सवालों के निशान,
उन्हें सुलझाऊँ भी तो कैसे, इसलिए मैं मुड़ गया।

लबों पर थे तेरे खातिर कई लफ़्ज़ सँभाले हुए,
वो व्यर्थ ही न बह जाएँ, इसलिए मैं मुड़ गया।

'मेघ', बरसात जमा हो रखी है आँखों में इतनी,
सैलाब में कहीं बह न जाएँ यार, इसलिए मैं मुड़ गया।

मंगलवार, २२/९/२६, ७:०० PM
अजय सरदेसाई — मेघ

तू मला दे...



जे जे सुख आयुष्यात, ते तुला घे,
उरले दुःख वेचून घे, ते तू मला दे.

तू भरभरून घे श्रावणातील जिव्हाळा,
वैशाखाचा शुष्क तिरस्कार तू मला दे.

तू जप आठवणींत आपल्या भेटी-गाठी,
तिष्ठणारे विरहाचे ते निवडुंग तू मला दे.

पौर्णिमेची ती सुंदर चांदरात तू ठेव,
निबिड तिमिराची ती अमावस तू मला दे.

आयुष्यातले कठीण क्षण तुला झेपणार नाही,
मी जाणतो हे, ते सर्व क्षण हळूच तू मला दे.

तू जप तुझ्या ओठांवरचे ते निरागस हासू,
तुझ्यावर निर्व्याज प्रेमाचा हक्क मात्र तू मला दे.

म्हणतो 'मेघ', तुझ्यासाठी मी बरसेन सदा,
कवितेतून बरसण्याचा अधिकार तू मला दे.

मंगळवार, २२/९/२६, ४:३० PM
अजय सरदेसाई - मेघ

मैत्री


तू दृष्टीस पडू नये म्हणून मी वळलो;
भेट आपली होऊ नये म्हणून मी वळलो.

सुंदर आठवणी मैत्रीच्या, जागृत अजून,
त्या कटू होऊ नयेत म्हणून मी वळलो.

डोळ्यांत टचकन दाटले अश्रू अनवट,
तू ते पाहू नयेत कधीच म्हणून मी वळलो.

मैत्री आपली चिंच-बोरांएवढी जुनी,
सुकली ती झाडे आता, म्हणून मी वळलो.

बिगरी, शाळा, कॉलेज केव्हाच मागे सुटले,
तरी हाक तुझी कानांत घुमते, म्हणून मी वळलो.

डोळ्यांत तुझ्या आज दिसले प्रश्न अनेक,
ते आज मी सोडवू तरी कसे, म्हणून मी वळलो.

शब्द ओठांवर होते तुझ्यासाठी खूप जपलेले,
ते व्यर्थ आता वाहू नयेत म्हणून मी वळलो.

मेघ म्हणतो, पाऊस साचला डोळ्यांत किती,

त्या पुरात आपण वाहून जाऊ नये, मित्रा—म्हणून मी वळलो.

मंगळवार, २२/९/२०२६, १:२५ PM
अजय सरदेसाई — मेघ

Saturday, 19 September 2026

THE STILL POOL


 


Within my heart there lies a pool, profound and still,

Where longing gathers silently, against my will.

Beneath its quiet surface, hidden currents flow,

Of all the love I cannot speak, yet cannot let go.


Separation sleeps somewhere within my restless mind,

While love upon my lips remains, tender and undefined.

Beyond the reach of words there lingers doubt unseen,

Yet still I walk through life, though nothing stays serene.


Amid a thousand faces, I walk my path alone,

For solitude has slowly made my silence known.

And this is not surrender, nor a wound I must conceal,

It is the quiet resolve with which I choose to feel.


The moment you draw near to me, the old ache starts anew,

For every breath of closeness brings separation into view.

And though we say so little, somehow all is understood,

There is a yearning in your eyes that says what words never could.


I have guarded countless moments, deep within my heart,

And in each one, somehow, you remain the deepest part.

Though I have lost you in the world, I have not lost you still,

For I have built my home with memories against my will.


Some nights the moonlight drenches all the darkness in its glow,

Some nights it is my burning mind that sets the dark aglow.

I know that you are not here, yet in every breath I take,

Your form returns, a silent presence memory cannot forsake.


Whatever wounds that fate has carved, whatever scars remain,

My heart still waits to meet you, through the longing and the pain.

I turned my sorrow into song, my silence into sound,

And that is why the melody runs deep, immense, unbound.


Who am I, and whose am I, and for what purpose do I stay?

The question once seemed meaningful; now it fades away.

I have carried it for far too long, through every loss and strife,

Until the question itself became a burden called a life.


So now I search within myself for what I sought in you,

Beyond the shadows of the past, beyond what once I knew.

The pool remains, the waters still, the surface clear and deep—

And somewhere in that silence lies the self I long to keep.


For what I thought was separation was a journey back to me,

And what I called your absence was a deeper mystery.

The still pool holds no answer, yet somehow makes it plain:

To lose, to love, to search within — and find myself again.


Saturday, 19/9/2026 , 10:30 PM

Ajay Sardesai -Megh

डोह


हृदयात माझ्या एक डोह आहे,
त्यात साठलेला मोह आहे।

मनात दडलेला विरह आहे,
तरी ओठांवरती स्नेह आहे।

शब्दांपलीकडे एक संदेह आहे,
तरीही जगण्याचा निर्वाह आहे।

गर्दीत असूनी एकांती राह आहे,
हाच खरा जगण्याचा निग्रह आहे।

तू येता क्षणभर जवळ माझ्या,
मनात पुन्हा अभेटीचा दाह आहे।

न बोलताही कळते सारे काही,
नजरेत कुठली तरी चाह आहे।

जपले कितीतरी क्षण मनाशी,
प्रत्येक क्षणात तुझा अवगाह आहे।

हरवूनही तुला हरवले नाही,
आठवणींचाच माझा गेह आहे।

कधी चांदण्यात रात्र भिजते,
कधी मनातही विदाह आहे।

तुझ्या नसण्याची जाणीव तरी,
श्वासाश्वासात तुझा विग्रह आहे।

नशिबाने दिल्या जखमा किती,
तरी भेटण्याचा उत्साह आहे।

दुःखाला मी गीत केले आहे,
म्हणून सूरही झाला अथाह आहे।

मी कोण कुणाचा, कशासाठी,
हा प्रश्नच आता दुराग्रह आहे।

स्वतःतच शोधतो स्वतःला,
हाच माझा अंतिम आग्रह आहे।

शनिवार, १९/९/२६ , ७:०० PM
अजय सरदेसाई -मेघ


डोह — शब्दार्थ

डोह — खोल, शांत दिसणारं पाण्याचं तळं (नदी/विहिरीतला खोल भाग)
मोह — आसक्ती, ओढ, भुरळ
विरह — ताटातूट, वियोगाचं दुःख
स्नेह — प्रेम, जिव्हाळा, आपुलकी
अवकाश — पोकळी, मोकळी जागा, अवसर
आवाह — आवाहन, हाक, पुकार (साद घालणे)
संदेह — शंका, संशय
निर्वाह — उदरनिर्वाह, जगण्याची तरतूद/चालवणं
राह — रस्ता, वाट, मार्ग
निग्रह — दृढनिश्चय, आत्मसंयम, ठाम राहणे
दाह — जळजळ, तीव्र वेदना/आग
चाह — ओढ, आवड, इच्छा
अवगाह — खोल बुडी, सखोल अनुभव/तल्लीनता
गेह — घर, निवासस्थान
विदाह — तीव्र जळजळ, दाह/वेदना
विग्रह — (इथे) मूर्ती/रूप/स्वरूप (इतर अर्थ: कलह/संघर्ष; व्याकरणात सामासिक शब्दाची फोड)
उत्साह — जोश, आनंदाची ऊर्जा
अथाह — अगाध, मोजता न येण्याइतकी खोली/विस्तार
दुराग्रह — हट्टाग्रह, निरर्थक हट्ट
आग्रह — हट्ट, विनंती

विलक्षण रात




त्या रात्री वाऱ्याची वरात होती
काय सांगू, विलक्षण रात होती

शब्दावाचून संवाद चालत होता
शब्दांशी जवळीकही सलत होती

रातराणीचा गंध पसरला होता
धुक्याची चादर विरत होती

आठवणींचा झोका झुलत होता
भूतकाळाची सावली सरत होती

ओठांवरच प्रश्न विरत होता
मौनातच उत्तरे मिळत होती

शनिवार, १९/९/२६, ४:२१ PM
अजय सरदेसाई — मेघ

Friday, 4 September 2026

गोकुळीचा काला



दुध-दह्याची धार मिसळली यमुनेत आज,
मुखी मधुर शर्करा-नवनीत गोळा।
देवकीनंदन गोपाळा, तो गोकुळीचा ग्वाला,
सोबत्यांसी घेऊनी करतो गोकुळी काला॥

गोपाळांच्या संगती खेळे यशोदेचा गोपाळ,
हास्य-विनोदांनी दुमदुमला सारा गोकुळ।
कुणी आणिले दही, कुणी लोण्याचा गोळा,
प्रेमानंदे रंगला सारा हा न्यारा गोकुळीचा मेळा॥

गोविंदा रे गोपाळा, नंदाचा तू बाळा,
तुझ्या नामघोषाने पावन हा सुख सोहळा।
दही-दुधाच्या धारेत भक्तिभाव ओथंबला,
कृष्णनामाने जीव आनंदे न्हाऊन निघाला॥

नंदाघरी, यशोदेच्या अंगणी आज आनंदाची उधळण,
कान्हाच्या मुखी दिसे चंद्राची कोवळी किरण।
मुरलीच्या स्वरांनी मोहित गोकुळजन,
हरिनामाच्या गजरात नाचे सकळ वृंदावन॥

गोविंदा रे गोपाळा, नंदाचा तू बाळा,
तुझ्या नामघोषाने पावन हा सुख सोहळा।
दही-दुधाच्या धारेत भक्तिभाव ओथंबला,
कृष्णनामाने जीव आनंदे न्हाऊन निघाला॥

काला हा केवळ दही-दुधाचा नाही,
प्रेमानंदाची ही मेजवानी, दुसरी उपमा नाही।
एकत्र येती सारे, भेदभाव विसरती,
कृष्णाच्या गळ्यात अंतरीची प्रेम अर्पिती॥

गोविंदा रे गोपाळा, नंदाचा तू बाळा,
तुझ्या नामघोषाने पावन हा सुख सोहळा।
दही-दुधाच्या धारेत भक्तिभाव ओथंबला,
कृष्णनामाने जीव आनंदे न्हाऊन निघाला॥

गोकुळीचा काला... गोकुळीचा काला...
हरि गोविंदा... गोपाळा...

शनिवार, ५/९/२६ , ११:५० AM
अजय सरदेसाई -मेघ 

वेगळी वाट



वाळूचे कण, करोडों, तरी वेगळे,
काळाचे क्षण, अब्जों, तरी वेगळे।
एकाच सागरातील लाटा साऱ्या,
तरी किनारी उमटती ठसे वेगळे॥

आभाळातील तारे, अगणित जरी,
ओळख त्यांची आभाळापल्याड नाही।
फुलबागेत रंग हजारो फुलांचे,
बागेतच त्या हजारो फुलांची राई॥

माणसेही अशीच, गर्दीत असंख्य,
प्रत्येकाच्या मनात कहाणी वेगळी।
माणसं तीच जरी, माणुसकी वेगळी,
माणसामाणसांतील दुनिया वेगळी॥

क्षणाक्षणांनी सरत जातो हा काळ,
तरी आठवणींची प्रत्येक सावली वेगळी।
जीवन एकच जरी, धरा एकच सारी,
तरी प्रत्येकाची जगण्याची वाट वेगळी॥

शुक्रवार, ४/९/२६, ५:४५ PM
अजय सरदेसाई — मेघ

Tuesday, 1 September 2026

कविता


लेखणीत माझ्या शाई असावी,
लेखणीतून सुंदर कविता रिझावी।
कविता एका सुंदर मुलीने वाचावी,
आणि गोड गळ्याने तिने ती गावी॥


शब्दांमध्ये माझ्या भाव असावा,
प्रत्येक ओळींत प्रेमाचा गाव असावा।
ओठांवर तिच्या हळूच हास्य फुलावे,
हास्यात त्या मन माझे विरघळून जावे॥


कवितेचा अर्थ तिने अलगद उलगडावा,
ओळखून अर्थ गालावर लालिमा पसरावा।
स्वर तिचा माझ्या हृदयात दरवळावा,
तेव्हा माझा प्रत्येक शब्द धन्य व्हावा॥


मंगळवार, १/९/२६ , १०:५६ PM

अजय सरदेसाई -मेघ

कळत नाही... !



काही बोलायाचे आहे, काय बोलू कळत नाही,
नदीस नागमोडी वळणे, पण का? कळतं नाही।

इंद्रधनु पसरला या टोका कडुन त्या टोका कडे,
तो सप्त रंगीच का? ते अजुनही कळत नाही।

तो चकोर वेडा! चांदण्याचा तहानलेला!
ही तहान चांदण्याची काय? मज कळत नाही ।

श्रावणांत मेघ बरसतो बनांत नी पानांत,
मोरास ह्याचा घे मोठा आनंद, का ?कळत नाही ।

वैशाखात पाऊस बरसला, मातीत सुगंध दरवळला,
मन माझे का उमलून प्रसन्न झाले, खरंच कळत नाही ।

तो तृषित वैरागी एक, मी तहान फेडली,
माझेच मन तृप्त का झाले, कळत नाही।

हा कोण जाणता,अंतरात माझ्या दडला,
ज्यास सर्व उमगते, कळते! हे कळत नाही ।

मंगळवार, १/९/२६ , १०:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

सुलह


आँखें डबडबा गईं रौशनी से,
सहर ने शायद शरारत की मुझसे।

मैं अँधेरों में रहने का आदी हूँ,
आफ़ताब ने छेड़खानी की मुझसे।

आँखों की शबनम को सँभाल लिया मैंने,
कली की ओस मगर सही न गई मुझसे।

हवा ने भी छुआ तो लरज़ उठा दिल,
ये नाज़ुक-मिज़ाजी कहाँ ले चली मुझसे।

धूप का एक टुकड़ा गिरा जो आँगन में,
बरसों पुरानी ख़ामोशी दरक गई मुझसे।

अब चाँद से भी लगती है कुछ तपिश-सी,
शायद हर उजाला यही कह गया मुझसे।

सितारों की चिलमन में छुप के देखा,
मगर एक किरण भी न छुपी मुझसे।

शजर की परछाई में पनाह ढूँढी,
मगर पत्तों ने धोखा किया मुझसे।

अब सोचता हूँ बुझा दूँ हर एक दीया,
मगर दिल की लौ भी तो बुझी न मुझसे।

फिर सोचा शायद यही तो मंज़िल थी,
अँधेरा तो बस खेल रहा था मुझसे।

रौशनी से भागकर मैं जाऊँ कहाँ,
वो ख़ुद मेरे अंदर छुपी थी मुझसे।

अब आँखें डबडबाती नहीं उजाले से,
ये सुलह शायद ख़ुद रौशनी ने की मुझसे।

मंगलवार, १/९/२६ , ६:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

Monday, 31 August 2026

इश्क़


चाहत का दावा तो सभी करते हैं,जान मगर कहाँ फ़िदा करते हैं।

घूँट पीकर भी ज़हर का अक्सर,इश्क़ वाले कहाँ मरा करते हैं।

दिल को रखकर हथेली पर अपने,लोग फिर भी कहाँ डरा करते हैं।

जो न पाएँ कभी ख़ुशी अपनी,हम उन्हीं के लिए दुआ करते हैं।

दर्द जितना भी हो नसीबों में,इश्क़ वाले कहाँ गिला करते हैं।

ज़ख़्म अपनों से मिल भी जाएँ तो,फिर भी हम उनसे बस वफ़ा करते हैं।

जिसको खोकर भी भूलना चाहें,उसकी यादें सदा रखा करते हैं।

इश्क़ में हारना भी जीत है यारो,इश्क़ वाले यही कहा करते हैं।

मौत आए तो आए इश्क़ में हम,ज़िंदगी को क़ज़ा करते हैं।

'मेघ' ये कैसी अजब मोहब्बत है,लोग जीते हुए मरा करते हैं।

सोमवार, ३१/८/२६ , ७:१८ PM
अजय सरदेसाई -मेघ

ओस की एक बूँद




थी एक कली बड़ी नाज़ुक-सी,
पत्तों के बीच थोड़ी सहमी-सी,
ओस ज़रा-सी क्या पी ली उसने,
वह खिल गई एक गुलशन-सी।

कल तक थी जो ख़ामोश-सी,
अपने ही डर में सिमटी-सी,
छू गई किरण जब भोर की उसको,
महक उठी फिर मधुबन-सी।

हवा चली तो पंखुड़ियाँ बोलीं,
बिखरी ख़ुशबू कुछ अनकही-सी,
जिसको समझा था अंत सफ़र का,
वह निकली नई शुरुआत-सी।

धूप मिली तो रंग निखरने लगे,
रात गई तो आँखें खुलीं,
एक बूँद ने इतना भर दिया,
सूनी शाख़ पे सौ ख़ुशियाँ खिलीं।

जीवन भी कुछ ऐसा ही है,
कभी धूप, कभी बदली-सी,
बस प्रेम की ओस ज़रा मिल जाए,
रूह खिल उठे उस कली-सी।

कल जो थी सहमी, आज वही तो
बन बैठी है ख़ुशबू बनकर,
एक नन्हीं-सी ओस की बूँद ने
जीना सिखला दिया मुस्काकर।

सोमवार, ३१/८/२६, ०२:०२ PM
अजय सरदेसाई -मेघ

Friday, 28 August 2026

बुरे भी, भले भी ...


दुनिया से सभी जाएँगे, बुरे भी, भले भी,
साथ ज़िंदगी का खोएँगे, बुरे भी, भले भी।

ज़िंदगी ने देखे जितने, ख़्वाब सभी टूटेंगे,
आज हँसें जो कल रोएँगे, बुरे भी, भले भी।

वक़्त एक दिन सबका हिसाब माँगेगा यहाँ,
आँसू सभी बहाएँगे, बुरे भी, भले भी।

मिट्टी में मिलेंगे सब, न ऊँच रहे न नीच,
इक रोज़ फ़ना सब होंगे, बुरे भी, भले भी।

चाहे जो भी हो नाम-ओ-निशाँ इस जहाँ में,
इक दिन तो भुलाए जाएँगे, बुरे भी, भले भी।

‘मेघ’ इतना गुरूर क्यों, ये ज़िंदगी दो दिन की है,
आख़िर ख़ाक में मिल जाएँगे, बुरे भी, भले भी।

शनिवार, २९/८/२६ , ९:२० AM
अजय सरदेसाई -मेघ

बेख़बर है...


कैसा सफ़र है, मंज़िल से राहगर बेख़बर है,
मैकदों से भरा शहर है, मगर बशर बेख़बर है।

किसे ढूँढ़ता रहा ता-उम्र, किसे मालूम है,
जिसे अपना समझा था, वही रहबर बेख़बर है।

दरख़्तों ने तो मौसम की ख़बर रखी है अब तक,
मगर अपनी ही जड़ों से हर शजर बेख़बर है।

जाम हाथों में लिए बैठे हैं प्यासे सारे रिंद,
मैकदा आबाद है, फिर भी साक़ी बेख़बर है।

रास्ते ख़त्म हो जाएँ, फिर कहाँ जाए मुसाफ़िर,
जाने क्यों मंज़िल से अब तक मेरी डगर बेख़बर है।

मेघ, शायद राज़-ए-हस्ती यही है आख़िरकार—
जो समझता है ख़ुद को, वो ही रहबर बेख़बर है।

शुक्रवार, २८/८/२६, ११:३० PM
अजय सरदेसाई — मेघ

कितने आईने टूटे...

 




अल्फ़ाज़ तेरे यूँ थे कि हम टूटे, कितने भरम, कितने दिल टूटे।

रिंद से न पूछो दिल की तड़प, जब सामने मय के पैमाने टूटे।

फ़ुरकत इतनी लंबी न कर, कि मिलने के हौसले टूटे।

सर पे कफ़न ले चले हैं उस जानिब, अब चाहे दिल टूटे या बदन टूटे।

मेघ, अब किस बात का शिकवा करें, कितने अक्स छूटे, कितने आईने टूटे।

शुक्रवार, २८/८/२६ — ११:११ AM अजय सरदेसाई — मेघ

Wednesday, 26 August 2026

जरुरी तो नहीं।



तुम भी मुझसे प्यार करो, ये ज़रूरी तो नहीं,
मगर मुझसे नफ़रत करो, ये भी ज़रूरी तो नहीं।

हर मोड़ पे मेरे साथ ही चलो, ये ज़रूरी तो नहीं,
बस राहों में तन्हा छोड़ो, ये भी ज़रूरी तो नहीं।

सुना है दर्द बाँटने से दर्द कम हो जाता है,
तुम मेरे ग़म में भी घिरो, ये ज़रूरी तो नहीं।

कभी तन्हाई में याद आ जाऊँ अगर मैं,
तो आँख भर के रो लो, ये ज़रूरी तो नहीं।

तेरा बसेरा मेरे दिल में है, ये जानते हैं सभी,
मेरा बसेरा तेरे दिल में हो, ये ज़रूरी तो नहीं।

मेरी चाहत का कोई हक़ नहीं तुम पर, ऐ हमदम,
बस मेरी चाहत से खफ़ा हो, ये ज़रूरी तो नहीं।

मंगलवार, २६/८/२६ , १२:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ 

Friday, 21 August 2026

शर एक आला.... ->




शर एक आला नी श्रावणाचा प्राण घेऊनी गेला,
इतिहास पुढेच घडला, दशरथाचा राम घेऊनी गेला।

शापाने केली दोघांची ताटातूट, रामास वनवास ठोठावून गेला,
पुत्रवियोग न साहवे दशरथाला, प्राण त्याचा देह सोडून गेला।

किती कठोर होती नियती, श्रावण बाळाची,
तितकीच कठोर होती नियती दशरथाची।

एक पिता रडला वनी, आपल्या पुत्राच्या शोकातं,
एक पिता रडला राज्यी, आपल्या पुत्राच्या वियोगात।

एक क्षणाचा अपराध, आयुष्याची शिक्षा देऊन गेला,
शर एक, दोन पिढ्यांचा अंत करवून गेला।

इतिहास साक्षी, नियतीस जे घडवायचे तेच घडले,
त्या एका शब्दभेदी शराने, पुढले रामायण घडले।

शुक्रवार, २१/८/२६ , ०८:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Saturday, 15 August 2026

तिश्नगी


दिल में कोई अनकही सी तिश्नगी सी हो,
हर ख़ुशी के पीछे कोई ख़ामोशी सी हो।

दिखती नहीं तुम, एक छिपी परछाईं जैसी हो,
ख़्वाब हो, ख़्वाहिश हो, कविता हो—कौन हो?

पास नहीं फिर भी हर पल पास लगती हो,
साँसों में बसी कोई ख़ुशबू सी हो।

नाम नहीं मालूम, चेहरा भी अनजान है,
फिर भी दिल को क्यों इतनी पहचानी सी हो?

मैं ख़ुद से पूछूँ—ये कैसी तलब है मेरी,
तुम हक़ीक़त हो, या कोई कहानी सी हो?

शनिवार, १५/८/२६, ७:०० PM
अजय सरदेसाई - मेघ

Friday, 7 August 2026

आय लव्ह समवन मोर...




जन्म दिया तूने मुझे, दिया एक नया सवेरा,

तेरी हर साँस में बसा, बचपन है मेरा,

फिर भी दिल की धड़कन में, चाहत है कुछ और,

आय लव्ह यू मॉं, बट आय लव्ह समवन मोर...


तेरी ममता का ऋण, मैं भूलूँगा ना कभी,

तेरे आँचल की छाँव, मिलेगी ना फिर कभी,

फिर भी दिल की एक धड़कन, किसी और की ओर,

आय लव्ह यू मॉं, बट आय लव्ह समवन मोर...


तुमने चलना सिखाया, उँगली थाम के मुझे,

हर गिरने पे उठाया, सीने से लगा के मुझे,

आज वो ही हाथ थामे, खड़ा है कोई और,

आय लव्ह यू मॉं, बट आय लव्ह समवन मोर...


तेरा प्यार है सागर, उसका प्यार किनारा,

तूने जीवन सँवारा, उसने जीवन पुकारा,

तुझसे मिली है दुनिया, उससे मिला है दिल का छोर,

आय लव्ह यू मॉं, बट आय लव्ह समवन मोर...


मॉं, तेरी जगह दिल में, कोई ले ना सके,

उसकी जगह भी कोई, फिर ले ना सके,

दोनों प्यार हैं मेरे, दोनों का अलग है छोर,

आय लव्ह यू मॉं, बट आय लव्ह समवन मोर...


शनिवार, ८/८/२६ , ९:२५ AM

अजय सरदेसाई -मेघ 

Wednesday, 5 August 2026

जीवन गाणे....


 


जीवन गाणे...
व्हावे...
गातच येणे...
गातच जाणे...

या धरेवर...
न जाणे कितीदा...
झाले येणे-जाणे...

जीवन गाणे...
व्हावे...
गातच येणे...
गातच जाणे...

नव्या जन्माचे...
नवेच गाणे...
क्षितिजापलीकडून...
नवे सूर  अन् नवे तराणे...

जीवन गाणे...
व्हावे...
गातच येणे...
गातच जाणे...

गाणे तुझे नि माझे गाणे...
मिळून गाऊ आपुले गाणे...
कोण जाणे, भेट पुन्हा कधी...
अन् कधी अचानक...
निघून जाणे...

जीवन गाणे...
व्हावे...
गातच येणे...
गातच जाणे...

बुधवार, ५/८/२६ , ४:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Thursday, 30 July 2026

तुझ्या विना ( विरह गझल)


 

मतला:

तुझ्याविना इथे आता, स्थिरसा श्वास नाही

मनात नित्य तूच वसतेस, दुजा भास नाही

शेर १:

तुझी उपेक्षा जाळत असली, तरी त्रास नाही

प्रीतीच्याच वाटेवरती, माघारी प्रवास नाही

शेर २:

तुला पाहताच जडली प्रीती, दुसरा ध्यास नाही

या वेड्या हृदयामध्ये आता, कुणाचा वास नाही

शेर ३:

न ओठी तक्रार कुठली, डोळ्यांत आस नाही

वेदनेस व्यक्त करण्याचा, मनास प्रयास नाही

मक्ता:

तुझ्या परतण्याचा अजुनी, सुटला विश्वास नाही

हृदयाची हाक ऐक जरा तू, यात सायास नाही


गुरुवार, ३०/७/२६ , १२:०० PM

अजय सरदेसाई -मेघ

Tuesday, 28 July 2026

सावन की बदरियां

 


ठंडी हवा, काली घटा और पुरवइयां,

संदेश सावन का ले आई बदरइयां।

झूला भी पड़ गया, हर ओर गूंजी हैं कजरियां,

आँगन में नाच उठीं सखियां-सहेलियां।


मोर नाचे बन में, फैलाए पंखुड़ियां,

नदी भी उमड़ चली, तोड़ती किनारियां।

बूंदों ने जगा दीं धरती की अंगड़ाइयां,

हर पत्ता, हर डाली गाए सावन-रागिनियां।


बिजुरिया कड़की नभ में, गरजीं बदरियां,

खेतों में रोपें किसान हरी कतरियां।

पपीहा पुकारे प्रिय को, गूंजीं वादियां,

धरती दुल्हन बनी, ओढ़े हरी चुनरियां।


सोमवार, २७/७/२६. , ११:११ AM

अजय सरदेसाई -मेघ 

Monday, 27 July 2026

झुंज





माझी एक झुंज वाऱ्याशी,

जो उडवू पाहतोय सर्वस्व।

एक झुंज माझ्या मनाशी,

जे जडून राहतं हट्टाशी॥


एक झुंज या काळाशी,

जो थांबत कधीच नाही।

एक झुंज माझ्या स्वप्नांशी,

जी झंझावातात विझून जातात॥


एक झुंज माझ्या अश्रूंशी,

जे डोळ्यांबाहेर पडू पाहतात।

एक झुंज माझ्या स्मिताशी,

जे दुःखात हरवून जातात॥


एक झुंज नियतीशी,

जी रोज नवा डाव मांडते।

एक झुंज माझ्या धैर्याशी,

जे हरूनही पुन्हा उभं राहतं॥


जगतो आहे मी हे आयुष्य,

पण जगणं इतकं सोपं नाही।

जगण्यासाठी रोज झुंजावं लागतं

आयुष्याशीच — दुसरं काही नाही॥


या झुंजींच्या वाटेवर,

मीच माझा सखा ठरलो।

हार कितीही समोर आली,

तरी लढतच राहिलो॥


सोमवार, २७/७/२०२६ , ११:५० AM

अजय सरदेसाई -मेघ

Wednesday, 22 July 2026

अवशिष्ट


 

शब्द न उरले करण्या प्रेम व्यक्त,

का, कसे, केव्हा झाले शब्द रिक्त!


शब्द झिजले, प्रेम, प्रेम ना उरले,

तो उन्माद सरला, ते आकर्षण न उरले.


जीवनाची संध्याकाळ आली जवळ,

जे उरले अवशिष्ट, ते स्मरण केवळ.


ना खंत उरली, ना उरली आस,

फक्त उरला एक शांत, मोकळा श्वास.


राहिला मनात कुठेतरी एक विचार घन,

एकदा प्रेम केले होते उत्कट, हेच खरे धन.


बुधवार, २२/७/२६, १२:४५ PM

अजय सरदेसाई – मेघ

Tuesday, 21 July 2026

सजल नयन निरोप तुज आई


 

सजल नयन निरोप तुज आई
सजल नयन निरोप तुज आई

आज स्मरते ती अंगाई तुझी आई
तू गातसे जी निजवण्या मज आई
डोक्यावर मायेचा फिरवून हात
ऐकवीन म्हणतो तुला ती आई
परी तू आज गेली चिर निद्रेत आई.

सजल नयन निरोप तुज आई

शाळेत सोडाया येसी तू आई
पुस्तकांत भरसी स्वप्न नवी आई
कष्टाचे घाम गाळून तुझे
मोठा केलेस मला घडवुनी आई
परी तू आज गेली चिर निद्रेत आई.

सजल नयन निरोप तुज आई

माझ्या यशात तुझे हसू खुलते आई
सुख माझे तुझ्या डोळ्यांत दिसते आई
कधी न सांगिले दुःख तुझे मज
आनंदातच जगली आयुष्य आई
परी तू आज गेली चिर निद्रेत आई.

सजल नयन निरोप तुज आई

आज घरात स्तब्ध शांतता आई
तुझ्याविना रितेपण दाटते आई
संस्कारांचा वसा तुझा घेऊन
जगेन पुढे मी नाव तुझे आई
परी तू आज गेली चिर निद्रेत आई.

सजल नयन निरोप तुज आई

मागणे माझे आज परमेश्वरास आई
माझ्या पोटी पुढला जन्म मिळो तुज आई,
तू मुलगा नी मी आई तुझी व्हावे, आई
सांग तुही हेच देवाला, शपथ माझी तुला आई.

सजल नयन निरोप तुज आई
सजल नयन निरोप तुज आई


मंगळवार, २१/७/२६ , १२:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ