प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 31 August 2013

मुंबई नगरी



इथे लाखांचे खाक़ होती, राखेतून या फिनिक्स ही उड़ती

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

राजा इथे होतो भिकारी, भिकारी ही घालतो सफारी

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

उंच मनोरे इथे झुलती,बॉम्ब स्फोटांच्या छायेत राहती

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

इथे स्वप्नांची असे रेलचेल, तारकांची इथेच मैफिल

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

भ्रष्टाचारी राज्य करती , कष्टकरी जिथे मरती

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

या नगरी ची वेडी दुनिया,या नगरी ची आहे किमाया

इथे मिळे छोकरी मिळे कधीच नोकरी

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

 
अजय सरदेसाई (मेघ)
14/09/1994                                         9.30 am
 
 

तुझ्या आठवणी



किती वसंत येउनि गेले किती गुलमोहर मोहरूं गेले ,

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी

किती रांत्री एकल्या वेचिल्या, चंचाला मज रीझवून गेल्या ,

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी

विरहाचा हा असीम प्याला, एकटाच मी आहे प्यायला .

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी

मावळत्या ह्या माझ्या मनाच्या, दुखवून गेल्या झुन्या खपल्या

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी

शरीर ही मझे थकले आता , दृष्टी ही लागली  पैलतीरा.

तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी


अजय सरदेसाई (मेघ)
13/09/94                                              11.45 PM

इशारा मिलनचा




रिम झिम पडती श्रावण धरा  

मनी प्रीतीचा फुलला पिसारा

तनी पसरला गोड शहारा 

प्रिया मज कळला तुझा इशारा

 

न्हाहू पाहती या रिम झिम धरा 

मम पदर ढाळीतो चंचल वारा

प्रिया ,थांब जरा

मज कळला तुझा इशारा

 

काळोख पसरला चरा चरा 

मनी विचार मिलनचा पहा बरा ,

एकांत करू हा साजरा 

प्रिया , थांब जरा 

मज कळला तुझा इशारा.

 


अजय सरदेसाई (मेघ)
13/09/94                                               8:41 PM

जीवनात माझा येशील का ?





स्वप्नांत माझा येतेस जशी,
जीवनात माझा येशील का?
वेड्या माझा मनात प्रीतीच्या,
रेशीम गाठी विण्शील का?

जीवनात माझा येशील का?

श्रावनच्या रिम झिम सरी
बरसती जश्या धरेवरी,
बेधुन्द तशी होऊनि मज वर
प्रीती प्रिये तू करशील का?

जीवनात माझा येशील का?

स्वप्नातल्या ग नील परी
मूर्त होऊनि या वसुंधरी,
प्राजक्त होऊनि प्रीतीचा
अंगणी माझा बरसशील का?

जीवनात माझा येशील का?

अजय सरदेसाई (मेघ)
12/09/1994 7:30 PM

डोळे


मी अबोल आहे, असे तू नेहमी म्हणतेस.

पण… बोलताना तुझ्यासोबत शब्दच अपुरे पडतात.

मग मी बोलत नाही, फक्त तुला पाहतो.

बोलत असतात ते फक्त माझे डोळे.

पण तुझे त्यांच्याकडे लक्षच कुठे असते!

तुझ्या शब्दजंजाळातून तुला वेळ मिळाला तर पाहशील!

अग वेडे, प्रेमाला शब्दांची गरजच नसते.

डोळेही बोलून जातात कधी शब्दांच्या पलीकडले,

पण तू ऐकशील तर खरी!

अग प्रेमात गरज असते ती फक्त डोळ्यांचीच!

डोळसपणे एकमेकांना ओळखण्यासाठी, पारखण्यासाठी…

अग प्रिय व्यक्तीची अविरत वाट पाहतात ते डोळेच,

आणि विरहाने ओले होतात तेही डोळेच.

सुखाने न्हाऊन जातात तेही डोळेच.

इतकेच काय, प्रेमिकांची पहिली भेट घडवून देतात तेही डोळेच ना!

म्हणूनच सांगतो प्रिये— फक्त डोळ्यांनीच बोल.

शब्दांमागे लागू नकोस; शब्द खोटेही असतात.

फक्त डोळे खरे बोलतात,



फक्त डोळेच खरे बोलतात.

अजय सरदेसाई (मेघ)

 

27/08/1994                                                           7.30 PM



 
 



 

मनाचे फुलपाखरू

 ह्या कवितेचे अर्धे श्रेय जिनेन्द्र पाटील ह्या माझा मित्रचे आहे . ही कविता सुचली तेव्हा आम्ही दोघे दारू पीत बसलो होतो . Jinya आठवते का तुला ....





19/10/1993                                                     9.30 PM
 मनाचे फुलपाखरू
तुझया निळ्या निळ्या डोळ्यात, मी स्वतःला हरवून बसलो .
तुझया सोनेरी रेशमी केसांत, मी स्वतःला गुंतवून बसलो . 
तुझया गालावरच्या खळीत , मला चंद्रची कोर दिसते
तुझया भव्य कपाळावर ,चांदण्यांची टिकली हसते. 
तुझया डोळ्यांच्या किनारी ,मेघंचे काजळ असते
तुझा  पाणिदार  नयानंत ,पावसाचे पाणी हसते . 
तुझया गुलाबी ओठांवर ,गुलाबाचे फूल खीलते
माझा मनाचे फुलपाखरू ,त्यावर झुलते , त्यावर झुलते.
अजय सरदेसाई (मेघ)