प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday, 17 June 2026

फुलराणी


 


तूच ग सखे माझी फूलराणी,
तुझ्याचसाठी माझी सर्व गाणी।
तूच माझी बाग, मीच तुझा माळी,
तुझ्याविण सखे, सुनी झाडाची डहाळी।।

बागेस जेव्हा तुझी चाहूल लागली,
माझ्या सोनचाफ्याची कळी खुलली।
मोगऱ्याची वेल सरसर चढली,
मोगऱ्याची फुले बहरली।।

बागेस कळले पानोपानी,
जडली प्रीत दोघांच्या मनी।
तुझ्या नजरेची पडता सावली,
फुलाफुलांत प्रीत आपली विसावली।।

गंध दरवळला बागेत चोहीकडे,
फुलपाखरे भिरभिरती तिकडे।
चांदण्यांनी जणू रात्र सजविली,
प्रीतीची वाट फुलांनी भरली॥

कोकिळेने छेडली तान,
हरपून गेले माझे भान।
तू गाण्याची छेडली तार,
हृदयात जणू झंकारली सतार।।

मंगळवार, १९/६/२६ , ११:५५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Saturday, 13 June 2026

काही नर्म क्षण.....




काही नर्म क्षण सुंदर रुजले मनात,
त्या स्मृतींचे चित्र पुन्हा रंगले मनात।

जे गीत मी गायले तुझ्यासाठी तेव्हा,
ते गीत आजही हळवे गुणगुणले मनात।

तुझे स्मितहास्य अन् ते बोलके डोळे,
अजूनही सांजवेळी हळवे खुलले मनात।

तू दूर असूनी जवळीक तशीच रहावी,
हे न उलगडे कोडे, किती साचले मनात।

असेल "मेघ" जोवर ह्या धरेवर,
प्रेम तुझेच खोलवर रुजले मनात।

शनिवार, १३/६/२६ , २:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

Friday, 12 June 2026

सांजरंग

 


बाजींद वारा, समुद्र किनारा,
व्याकुळ लाटा, पुळणीच्या वाटा।
शंख-शिंपले रेतीवर पसरले,
मनमोहक हा निसर्ग सारा।।

डोंगर माथा, चिंचोळ्या रान वाटा,
झाडांची सळसळ, सरसर पानगळ।
पक्ष्यांची किलबिल,झऱ्यांची खळखळ,
निसर्गाचा आनंद, हृदयी निखळ।।

सखी पावस सर, वाराही सखा,
निसर्गाशी जडला अनोखा धागा।
एकीमुळे मनात दाटे ओलावा,
दुसऱ्यामुळे हृदयी सुखद गारवा।।

रानात जाणे कुठे बोले पारवा
मनात छेडीला कुणी मारवा।
क्षितिजावर चढला रंग केशरी,
सांज सजली घेऊन सूर मंजीरी।।

शुक्रवार,१२/६/२६ , ४:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Thursday, 11 June 2026

अधांतरी...



प्रेम आहे,
तुझ्यावर, की प्रेमाच्या कल्पनेवर,
अजून कळायचे आहे.

ते उलगडेल कधी!
की मीच समजावीन स्वतःला,
माहीत नाही!

पण प्रेम नक्की आहे...? कदाचित...
हा प्रश्न आहे की उत्तर?
अजून उलगडायचे आहे!

पण छान वाटतं आहे,
कदाचित प्रेमाची कल्पनाच सुंदर असते.
संमोहन असते,
आणि असेच संमोहित राहावेसे वाटते...
अधांतरी...

सत्य उलगडले,
तर जादू हरवेल याची भीती.
म्हणून उत्तरापेक्षा प्रश्नच प्रिय वाटतो,
कदाचित....

गुरुवार, ११/६/२६ , ३:३० PM
अजय सरदेसाई -मेघ 

चाहत का असर...


 

चाहत का असर अब कुछ मद्धम हो रहा है,
मेरी दीवानगी का खुमार कम हो रहा है।

ज़ख्मों का वो तूफ़ान भी पुरसुकून हो रहा है,
जो दर्द था कभी तेज़, अब नर्म हो रहा है।

तेरी याद का जो भँवर था, अब मिट रहा है,

दिल का वो पुराना वहम भी कम हो रहा है।

तूने जो न दिया कभी, वो माँगना छोड़ दिया,

शायद मुझ पर अक़्ल का करम हो रहा है।

टूटे हुए दिल पर अब वक़्त का हाथ है,

हर ज़ख्म धीरे-धीरे मरहम-सा हो रहा है।

शिकवों की किताबों को कब का बंद कर दिया,

अब ख़ुद से ही मेरा सलाम हो रहा है।

"मेघ" जो बरसता था, अब थमने लगा है वो,

इश्क़ की इस ज़मीन पर मौसम नर्म हो रहा है।

गुरुवार, ११ जून २०२६ | ११:११ AM

अजय सरदेसाई– मेघ

Wednesday, 10 June 2026

मैं घर बना रहा हूँ


 

मैं घर बना रहा हूँ, तू उसकी दीवारें बना,

हर दीवार से झाँकने, एक झरोखा बना।


धूप जब थक के बैठे, उसे भी छाँव मिले,

आँगन में प्यार का कोई, शजर पुराना बना।


रात उतरे तो उजालों की कमी महसूस न हो,

चाँद की राह दिखाता, तू कोई दीपक बना।


सिर्फ़ ईंटों से मकाँ, घर नहीं बन पाता,

रिश्तों की गर्माहट का, कोई कोना भी बना।


मैं नींव रख रहा हूँ, तू ऊपर छत चढ़ा,

मेरे हर ख़्वाब को, तू दीवार-सा आसरा बना।


और यदि तू ही बसे, इस दिल के मकाँ में कभी,

दरवाज़ा नहीं, बस एक झरोखा बना।


बुधवार, १०/६/२६, ३:०० PM

अजय सरदेसाई — मेघ 🌧️


Tuesday, 9 June 2026

प्रेम असे का असते?






प्रेम असे का असते?
नकळतच कुणावर जडते!
नजरेच्या अनावधानाने,
आयुष्यच सारे बदलते,
प्रेम असे का असते?

हेतू कुठलाही नसताना,
मन कुणासाठी झुरते,
गर्दीत हजारो चेहरे असता,
एकावरच येऊन अडकते,
प्रेम असे का असते?

त्याच्या एका हास्याने,
मन सारे मोहरुन जाते,
अबोल शब्दांमधले,
गुज सहज उमजते,
प्रेम असे का असते?

दूर असले तरी चित्त त्यापाशी,
डोळे न मिटताच मन स्वप्न बघते,
तो जवळ असता मनाचे फुलपाखरू होते,
प्रेम असे का असते?

सुख त्याचे आनंद देते,
दुःख त्याचे मनात सलते,
स्वतःहूनही अधिक त्याचे,
हित जपावे वाटते,
प्रेम असे का असते?

स्पर्शाविण कधी फुलते,
विरहातही कधी बहरते,
नजरेच्या डिठी-डीठी ,
सारे संभाषण होते,
प्रेम असे का असते?
प्रेम असे का असते?

मंगळवार, ९/६/२६ , ३:५५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Monday, 8 June 2026

सूर येती..., विरून जाती...


 



सूर येती... विरून जाती...
उरतात कंपने,..वाऱ्यावरी...,
हृदयावरी...
सूर येती... विरून जाती...

कोण स्वामी... या स्वरांचा,
सूर कुठून येती?
संमोहीत ही धरा...
संमोहीत राने होती.

वेणूचे सूर पडताच कानी...
मन, हृदय विरघळले,
त्या सूरांवर पहुडून सारे—
मी वृंदावन विहरले.

सूर येती... विरून जाती...
सूरांचीs.. सुप्त स्पंदने,
सप्तचक्रांत वसली,
नाद अनाहत उठता...,
भुजंगिनी......
जागृत झाली॥

मंगलवार, ९/६/२६ , ८:५५ AM
अजय सरदेसाई -मेघ

शांता शेळके यांच्या याच नावाच्या मुळ गीतावरुन स्फुरलेले,
 पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कंपोज केले आणि भारत रत्न लता दीदींनी गायलेले! 

अगं प्रेम असं कधी लपतंय गं?




अगं प्रेम असं कधी लपतंय गं?
अगं तुझ्या डोळ्यांत सगळं दिसतंय गं,
त्या नजरेत स्वप्न तरंगतंय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?

अगं एकटीच का तू गुणगुणतेस गं,
श्वासांच्या भाषेत काही सांगतेस गं,
गालांवर उमललेलं फूल बोलतंय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?

अगं लपून तू कटाक्ष टाकतेस गं,
भेटीच्या क्षणी का बावरतेस गं,
डोळ्यांतलं हसू उघडं पाडतंय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?

चांदण्यांनाही आपली चाहूल लागलीय गं,
वाऱ्याने तुझी गोष्ट गुणगुणलीय गं,
साऱ्या आभाळाला खबर झालीय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?


८ जून २०२६ । ७:४१ PM
अजय सरदेसाई 'मेघ'

Sunday, 7 June 2026

सखि, मंद झाल्या तारका - My version






सखि, मंद झाल्या तारका,
आता तरी येशील का?

ही रात्र रुपेरी चांदणी,
भरली मनात देखणी.
उणीव फक्त येथे तुझी,
सांग, तू येशील का?

हृदयात आहे प्रीत तुझी,
पाहतात डोळे वाट तुझी,
मनात ओढ भेटीची,
ती तू पूर्ण करशील का?

तो चंद्र तुलाच शोधतो,
सांगण्यास गुज तिष्ठतो.
माझी स्थिती ना वेगळी,
सांग, तू कधी येशील का?

हा काळ वेळ स्वप्नवत,
मन तुझ्या प्रेमात रत.
मी वाट पाहतो तुझी,
सांग तू येशील का?

सखि, मंद झाल्या तारका,
आता तरी येशील का?

रविवार, ७/६/२६ , ८:३० PM
अजय सरदेसाई - मेघ