तापल्या तव्यावर अंड्याचा थाट,
कांदा-मिरची-कोथिंबिरीचा खमंग घमघमाट!
कांदा-मिरची-कोथिंबिरीचा खमंग घमघमाट!
पिझ्झाचा ना तोरा हवा, ना बर्गरचा मान,
ऑम्लेट-पावापुढे त्यांची, फिकी पडते शान!
कटिंग चहाची साथ आणि, गप्पांचा फड,
एका घासात विसरवतो, टेन्शन सगळं जड!
खिशाला ना भार, ना कसला दिखावा,
रस्त्यावरच्या गाडीवर, चवीचा विसावा!
मध्यरात्री भूक लागो, वा सकाळची वेळ,
ऑम्लेट-पाव दिसताच, जमतो मनाचा मेळ!
अंडं-पावाचं नातं जणू, जन्मोजन्मीचं प्रेम,
एकदा चाखा राव, मग रोजचाच नेम!
शुक्रवार, १६/१०/२०२६ , ८:०० PM
अजय सरदेसाई -मेघ
