प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Sunday, 7 June 2026

सखि, मंद झाल्या तारका - My version






सखि, मंद झाल्या तारका,
आता तरी येशील का?

ही रात्र रुपेरी चांदणी,
भरली मनात देखणी.
उणीव फक्त येथे तुझी,
सांग, तू येशील का?

हृदयात आहे प्रीत तुझी,
पाहतात डोळे वाट तुझी,
मनात ओढ भेटीची,
ती तू पूर्ण करशील का?

तो चंद्र तुलाच शोधतो,
सांगण्यास गुज तिष्ठतो.
माझी स्थिती ना वेगळी,
सांग, तू कधी येशील का?

हा काळ वेळ स्वप्नवत,
मन तुझ्या प्रेमात रत.
मी वाट पाहतो तुझी,
सांग तू येशील का?

सखि, मंद झाल्या तारका,
आता तरी येशील का?

रविवार, ७/६/२६ , ८:३० PM
अजय सरदेसाई - मेघ

No comments:

Post a Comment