प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 30 May 2026

गुज बोलायचे आहे


तुझ्याशी गुज बोलायचे आहे,
मनातले सारे सांगायचे आहे।
डोळ्यांनी डिठी-डिठी,
न बोलताच सारे सा़धले आहे।।

ओठांवरी थांबले शब्द,
श्वासांत गाणे दाटले आहे।
तुझ्या अबोल सहवासात,
मन माझे हरखून गेले आहे।।

सांज उतरता वाटेवरती,
तुझी परतण्याची वेळ आहे।
तुझ्या डोळ्यांच्या कैदेतच,
दिवस सारा सरला आहे।।

हातात हात नसतानाही,
स्पर्श तुझा जाणवला आहे।
अंतर कितीही असले तरी,
धागा मनांचा जुळला आहे।।

"मेघ" अजूनही न बोलता,
किती काही उमगले आहे।
गुज बोलण्याआधीच रे,
प्रेम मनाशी जडले आहे।।

अजय सरदेसाई — मेघ
रविवार, ३१/५/२६ , ११:०० AM
अजय सरदेसाई -मेघ

जाणायचे आहे


काही मागणे नाही देवा, फक्त एकदा तुला पाहायचे आहे,
जग सारे तुझी महती गाते, पण तू कोण, हे जाणायचे आहे।

तुझे नाव घेत फिरती सारे, पण तू भेटत नाही कुणाला,
या कोड्याचे उत्तर मला जाणायचे आहे।

देवळात शोधले तुला, शोधले मशिदीच्या दारी,
राहतोस नेमका कुठे तू, एवढेच जाणायचे आहे।

ना शब्दांत तू, ना मौनात तू — मग दोन्ही पलीकडे कुठे आहेस, हे जाणायचे आहे।

जेव्हा स्वतःला भेटलो, तुझीच चाहूल ऐकू आली,
आता तुला नव्हे, स्वतःला जाणायचे आहे।

रविवार, ३१/५/२०२६ , ९:०५ AM
अजय सरदेसाई -मेघ

जानना चाहता हूँ


ऐ ख़ुदा, काम तो वैसे कुछ नहीं है, बस एक बार देखना चाहता हूँ, सब मानते हैं तुझे, जानता नहीं कोई मगर, बस मैं तुझे जानना चाहता हूँ।


ज़िक्र तेरा करते फिरते हैं क्यों, जब तू मिलता ही नहीं, इस पहेली को मैं सुलझाना चाहता हूँ।


मंदिर में ढूँढा, मस्जिद में ढूँढा, ढूँढा हर एक निशाँ, तू रहता है कहाँ, ऐ ख़ुदा, बस इतना जानना चाहता हूँ।


हर सिम्त तुझे ढूँढा, हर दर पे दस्तक दी, क्या तू मेरे भीतर है, बस इतना जानना चाहता हूँ।


जब अपने आप से मिला, तेरी ही आहट सुनाई दी, अब मैं तुझे नहीं, बस मुझको ही जानना चाहता हूँ।


शनिवार, ३०/५/२०२६, ९:१२ AM

अजय सरदेसाई -मेघ

दिल की बात


 


मतला
दिल की बात है, अपने दिलदार से कहो,
नुमाइश होगी गर किसी अग़यार से कहो।

दर्द-ए-दिल को यूँ न हर दरबार से कहो,
जो इसका मोल समझे, उस हक़दार से कहो।

इश्क़ की तिश्नगी को समझे जो ख़ुद दिलफ़िगार,
अपना दर्द उसी से कहो, उस ग़मख़्वार से कहो।

जहॉं दिल का नहीं, बस दौलत का हो कारोबार,
रूह की प्यास का क़िस्सा न उस मक्कार से कहो।

राज़ बिखर जाते हैं अक्सर सरे-बाज़ार में,
दिल का राज़ अपने महरम-ए-असरार से कहो।

ज़ख़्म गहरे हों तो हर शख़्स नहीं मरहम बने,
दर्द अपना किसी दर्दगुज़ार से कहो।

दिल की राह में न रखना कभी कोई दीवार,
जो भी कहना हो, खुलकर अपने यार से कहो।

जो लफ़्ज़ दिल से निकलें, वो होते हैं असरदार,
ऐसे सुख़न ही कहो, ऐसे इज़हार से कहो।

मक़्ता
"मेघ" चाहो गर मोहब्बत को मिले उसका जवाब,
अपने दिल की बात बस इक बार प्यार से कहो।

शनिवार, ३०/५/२०२६ , १०:३० AM
अजय सरदेसाई -मेघ

Tuesday, 26 May 2026

"तू माझं ऐक"


तू काही ही म्हण, पण तू माझं ऐक,
तू उगाच वाद घालू नकोस, माझं ऐक।।

मी शब्दांत नाही रे, हृदयाने बोलतो,
तू अर्थ शोधू नकोस, फक्त मनाने ऐक।।

कधीतरी रस्ते सारे चुकले तरी चालतील,
तू हात मात्र सोडू नकोस, एवढंच माझं ऐक।।

जग तुला हसेल कधी, कधी तुला तोडेलही,
तू स्वतःला हरवू नकोस, हे खरंच ऐक।।

थकशील तू कधी, वाट जड होईल जेव्हा,
तू हार मानू नकोस, माझा आवाज ऐक।।

चुका होतील रे, माणूस म्हणून होतातच,
तू स्वतःला शिक्षा करू नकोस, हे प्रेमाचं ऐक।।

वारा उलट्या दिशेने वाहतो कधीकधी,
तू पाठ फिरवू नकोस, दिशा बदलून ऐक।।

मी नसेन कधी जवळ, पण असेनच आत कुठेतरी,
तू आतल्या आवाजाला उगाच दाबू नकोस, त्याचं ऐक।।

तू काही ही म्हण, पण तू माझं ऐक,
हे जगणं तुझंच आहे रे — ते विसरू नकोस, ऐक।।

मंगळवार, २६/०५/२०२६, १२:४५ PM
अजय सरदेसाई - मेघ

Monday, 25 May 2026

काय सांगू राव


काय सांगू राव, काय माझं नाव,
आलो मी कुठुन, कोणतं माझं गाव।
वाटांनी माझ्या पायांना विचारलं —
कुठल्या दिशेचा तुला खरा ठाव?

काय सांगू राव, काय माझं नाव,
चेहऱ्यामागे लपला दुसरा चेहरा राव।
आरशानेही ओळख नाकारली —
सांग रे, तू चोर की साव?

काय सांगू राव, काय माझं नाव,
जगण्यासाठी रोज मांडतो नवा डाव।
कधी जिंकतो आयुष्याशी झुंजताना,
कधी स्वतःचाच होतो पराभाव।।

काय सांगू राव, काय माझं नाव,
स्वप्नांनीही केला माझ्याशी परका भाव।
कधी रंक भेटले, कधी भेटले राव —
सर्वांचे एकच — देवा, मला पाव।।

मंगळवार, २६/५/२०२६ , ११:४० AM
अजय सरदेसाई -मेघ

तू आणि मी


गेले ते दिवस, उरल्या फक्त आठवणी,
चंद्राच्या चांदण्यांसारख्या आपल्या मनी।
त्या आठवणींसोबत जगू — तू आणि मी।।

शब्द सारे विरून जातील काळाच्या प्रवाहात,
नातं आपलं राहील तरी एकमेकांच्या सहवासात।
हा सहप्रवास टिकवून ठेऊ — तू आणि मी।।

ऋतू जरी बदलले, वाटा जरी दूर गेल्या,
मनातली ओढ तरीही विरणार नाही।
त्या ओढीची विण जपू — तू आणि मी।।

सुखदुःखांच्या लाटांनी किनारे जरी झिजवले,
काळाच्या वादळांनी दिवस कितीही बदलले।
हातात हात घट्ट घेऊन चालू — तू आणि मी।।

प्रेम हृदयात उमलते, पण डोळ्यांत फुलते,
दोघांच्या डोळ्यांतही ते स्पष्ट दिसते।
उघड्या डोळ्यांनी जगू — तू आणि मी।।

जन्मोजन्मीची ही साथ आपली,
आत्म्याची आत्म्याशी गाठ आपली।
जन्मोजन्मी भेटत राहू — तू आणि मी।।

सोमवार, २५/५/२०२६, रात्री १०:००
अजय सरदेसाई — ‘मेघ’

जगण्या


अरे जगण्या, कुठं आहेस रे,
किती दिस झाले दिसलाच नाहीस।
कसा असतोस, काय करतोस —
एवढं तरी सांग की, जगण्या।।

कधी हसण्याच्या गर्दीत लपतोस,
कधी डोळ्यांतून निथळत येतोस।
हात धरायला गेलो तर —
ओंजळीतून वाळूसारखा सरतोस, जगण्या।।

पैशामागं धावत शोधलं तुला,
माणसांत गुंतूनही पाहिलं।
सापडलास मात्र दुसरीकडे —
कधी उमलत्या कळीत, कधी कोसळत्या पावसात, जगण्या।।

देवळाच्या पायऱ्या झिजवल्या,
उंबरठ्यावर डोकं टेकवलं।
भेटलास त्या कापऱ्या हंबरड्यात —
गायीच्या डोळ्यांत कालवे शोधताना, जगण्या।।

दक्षिण ते उत्तर पालथं घातलं,
भेटलास — पण रूप बदलून, जगण्या।
कधी म्हाताऱ्याच्या सुरकुत्या हास्यात,
कधी शेतकऱ्याच्या टपोऱ्या घामात, जगण्या।।

तुझा थांगच लागत नाही, जगण्या,
भेटशील कधी — नेम नाही।
आत्ता भेटशील, उद्या नसशील —
कसा धरू तुला, जगण्या।।

आयुष्यभर बाहेर भटकलो,
तुझ्या पाऊलखुणा शोधत राहिलो।
तू आतच होतास — श्वासाएवढा जवळ —
मीच दूर पळत सुटलो होतो, जगण्या।।

सोमवार, २५/५/२०२६ , १२:१० PM
अजय सरदेसाई -मेघ

Sunday, 24 May 2026

जिंदगी





अपना पता बता ज़िंदगी,
काफी दिनों से तुझसे मिला नहीं।
तू दिखती है कैसी, ज़िंदगी —
कुछ तो बता, ज़िंदगी।।

कभी हँसी में छुप जाती है,
कभी आँसू बन बह जाती है।
छूने को हाथ बढ़ाऊँ तो,
मुट्ठी से फिसल जाती है, ज़िंदगी।।

दौलत में तलाशा तुझे बहुत,
रिश्तों में भी थाम न पाया।
मिली तू उन ख़ामोश लम्हों में,
जहाँ कोई उम्मीद न थी, ज़िंदगी।।

कभी मंदिर की सीढ़ी चढ़ा,
कभी सजदों में माथा टेका।
मिली तू उस मासूम दुआ में,
जो होंठों पर काँप रही थी, ज़िंदगी।।

भागती रही उम्र यूँ ही,
तेरे निशाँ खोजते-खोजते।
तू थी मेरे भीतर ही कहीं —
मैं बाहर भटकता रहा, ज़िंदगी।।

रविवार, २४/५/२०२६,  ४:०० PM
अजय सरदेसाई -मेघ 

Saturday, 23 May 2026

सोनचाफा


तुझ्या प्रेमाचा सोनचाफा मनात दरवळतो,
अलवार सुगंध त्याचा माझ्या गीतात मिसळतो।।

शब्दांच्या पाकळ्यांवर स्वरदव तुझे अलगद चमचमतं,
माझ्या मनाच्या शांत तळ्यात चांदणं तुझे विरघळतं।।

तुझ्या मिठीत हरवावे असे प्रत्येक क्षण सांगतो,
तुझा मोहक गंध माझ्या श्वासांत मिसळतो।।

तुझ्या ओठांचा स्पर्श जसा पहिला पाऊस धरणीवर,
बेधुंद त्या अनुभवातून मी चिंब भिजून निघतो।।

तुझ्या डोळ्यांत साठलेल्या त्या प्रेमडोहाची शपथ,
डुंबला त्यात जो एकदा, तो का पुन्हा वर तरतो?

शनिवार, २३ मे २०२६ | दुपारी २:१६
— अजय सरदेसाई ‘मेघ’

Friday, 22 May 2026

तुझ्याविना



जगण्यात काय आनंद तुझ्याविना,
माझे अस्तित्व तरी काय तुझ्याविना।

हे जग किती सुंदर आहे खरोखरच,
पण त्या जगात अर्थ काय तुझ्याविना।

हे सूर्य, चंद्र, तारे सुंदरच सारे,
त्या सुंदरतेचा असर काय तुझ्याविना।

पावसाच्या सरीही कोरड्या भासतील,
भिजण्यात आनंद काय तुझ्याविना।

फुला-फुलांत रंग भरलेले ओतप्रोत,
पण त्यात गंध कुठे, केसांत तू माळल्याविना।

स्वरांत जरी माधुर्य भरलं असेल,
गाण्यात जीव कुठे तुझ्याविना।

‘मेघ’ भावनांना माझ्या स्पर्श तुझा लाभला,
नाहीतर कवितेलाही अर्थ काय तुझ्याविना।

शुक्रवार, २२/५/२०२६ , १:३७ PM
अजय सरदेसाई -मेघ

Thursday, 21 May 2026

गायत्री - फक्त तुझ्यासाठी ही गज़ल


तुम को देखा तो ये खयाल आया,
जिंदगी धूप… तुम घना साया।
The moment I saw you, one thought filled my heart —
life is a harsh afternoon, and you are a cool serene shade.

जिंदगी में लोग आते और जाते रहे मेरी,
एक तुम ही थी जिसने मेरा साथ निभाया।
Many people came and went throughout my life,
but you alone stayed beside me till the end.

सोचता हूँ तक़लीफ़ों के सिवा मैंने क्या दिया तुमको,
जबकि जिंदगी का हर सुख मैंने तुमसे ही पाया।
I often wonder what I ever gave you except pain,
when every joy in my life was received from you.

मेरा वजूद गर है, तो वो आज तुमसे ही  है,
तुमने अपना वजूद भी मुझमें समाया।
If I possess any identity today, it exists because of you,
and you dissolved your own existence into mine.

मैं चाहता हूँ तुम्हें कयामत की हद तक,
शायद इससे पहले मैंने तुम्हें ये नहीं बताया।
I love you beyond the limits of eternity,
perhaps I had never truly told you this before.

मैं जानता हूँ कि तुम्हें शायद यक़ीन नहीं,
वो तुम ही हो जिसमें मैंने ख़ुद को पाया।
I know you may still find it hard to believe,
but it is within you that I finally discovered myself.

आज मै उन गुनाहों का इजहार करता हूं,
जिन्हें आज तक कभी भी मै कह न पाया।
Today, I confess those silent wrongs of mine,
the ones I could never gather the courage to speak of.
Ajay Sardesai ‘Megh’


शुक्रवार, २२/५/२६ — ९:३५ AM
अजय सरदेसाई ‘मेघ’

Celebrating 28 years of togetherness with you.

Wednesday, 20 May 2026

पता थे मुझे


 

तेरी उल्फतों के मायने पता थे मुझे,
मेरी उम्मीदों के दायरे पता थे मुझे।

मोहब्बत की मगर चाही नहीं कभी,
तेरे मेरे बीच के फ़ासले पता थे मुझे।

एक पत्थर से प्यार हुआ — यही नसीब,
इस सफ़र के सारे ज़ाब्ते पता थे मुझे।

तेरी ख़ामुशी भी पढ़ लिया करता था,
लफ़्ज़ों के अपने मसले पता थे मुझे।

तू बदल गया तो हैरत नहीं हुई मुझको,
वक़्त के भी अपने फ़ैसले पता थे मुझे।

हम ने हँस के काट दी तन्हा ये ज़िंदगी,
अश्क़ों के बहने के सिलसिले पता थे मुझे।

अब शिकायतों का कोई सिलसिला नहीं,
अहबाब के सारे बहाने पता थे मुझे।

मंगलवार, २०/५/२६ , १२:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Monday, 18 May 2026

क्षण येती क्षण निघून जाती


क्षण येती क्षण निघून जाती,
आयुष्य जणू दिव्यात वाती।।
तेवती पणत्यात मंद ज्योती,
तेल सरता विझुनी जाती।।

वारा येतो नी वारा जातो,
थंडावा तनास देऊन जातो।।
लाट उठते अन् लाट विरते,
सागर मात्र तसाच असतो।।

मनपटलावर विचार निर्झरती,
न कळे मूळ विचार कुठून येतो।।
येती जाती भाव मनाचे,
साक्षी अंतरी कोण बसतो।।

शब्द उमटती ओठांवरती,
अर्थ कुणी आतून देतो।।
देह चालतो काळासंगे,
जीव कुणाच्या हाकेने येतो।।

नभ पसरते अंतरी माझ्या,
सीमा कुठेच दिसत नाही।।
शोधत गेलो स्वतःलाच मी,
‘मेघ’, शोध तरीही संपत नाही।।

सोमवार, १८/५/२६ , १२:३८ PM
अजय सरदेसाई -मेघ

Sunday, 17 May 2026

वो: एक याद


आज फिर उसी याद से मुलाक़ात रास्ते में हो गई,
उसने पहचानने से ही इनकार कर दिया… आँखें भर आईं।

फिर मैंने ही अपनी पहचान, कॉलेज के दिनों वाली याद दिलाई,
उसकी आँखों में एक झलक-सी उठी… पर होंठ खामोश ही रहे।

बस में सफ़र करते हुए जो मुस्कान कभी उसने दी थी,
ज़िंदगी का वो पन्ना जैसे कब का फट चुका था।

कैंटीन की उस मेज़ पर अब धूल की परतें जम गई हैं,
उन ठहाकों की आवाज़ें वहीं कहीं दफ़न हो गई हैं।

विदा लेते समय हाथ भी एक पल को काँप उठे,
लफ़्ज़ मगर होंठों के पीछे उलझकर रह गए।

भीड़ में भी कुछ पल ठहरकर वक़्त हमें निहारता रहा,
पुराने दिन आँखों में धीरे-धीरे लौट आए — और चले भी गए।

वो मुड़कर चली गई, रास्ता खाली-सा रह गया,
हवा में कई सवाल — अनकहे, अधूरे, बिखरे रह गए।

सोमवार, १८/५/२६ ,८:५५ AM
अजय सरदेसाई — मेघ

या भवनातील गीत पुराणे



या भवनात ते गीत पुराणे गुंजते अजून,
आर्त संगीत ते पुराणे वाजते भिंतींना बिलगून।।

बंद खिडकी मागे अजुनी येतो विरळ श्वास कुणाचा,
विरलेले ते स्वर कुणाचे शोधत फिरतो वारा दमुन।।

धूसर सावल्या प्रतिक्षेत बसल्या कोणाच्या अजुन,
चांदणेही हरवून बसले या अंगणी उतरुन।।

विझल्या दीपांमधुनी अजुनी धूर उठतो हळूच,
जणू काळोखाशी कुणीतरी बोलत आहे रुसून।।

रिकाम्या या दालनामध्ये काळ थबकला कधीचा,
भंगलेल्या त्या आरशातले चेहरे गेले विरघळून।।

आता उरल्या फक्त स्मृती या दाराशी टेकून,
भवन स्वतःलाच ऐकत बसते त्या गीतास बिलगून।।

या भवनात जो जो येतो,नकळत जातो हरवून,
स्वर राहतात त्यांचे इथेच या भिंतींमध्ये अडकून।।

रविवार, १७/५/२६ , ४:२० PM
अजय सरदेसाई -मेघ

"ती" : आठवण


आज पुन्हा त्या आठवणीस  मी रस्त्यात गाठले होते,
तिने ओळख दिलीच नाही, अश्रू डोळ्यांत दाटले होते।।

मग मीच सांगितली ओळख कॉलेजमधली,
डोळ्यांत झलक ओळखीची… तरी ओठ मिटलेच होते।।

बसमधून जाताना दिलेले स्मित ती विसरली होती,
कॉलेज आयुष्यातील ते पान कधीच फाटले होते।।

कॅन्टीनच्या त्या टेबलावर धूळ साचली होती,
त्या गप्पांचे आवाज तिथेच हरवले होते।।

निरोप घेताना हातही थरथरले क्षणभर,
शब्द मात्र ओठांआड कुठेतरी अडकले होते।।

गर्दीतही काही क्षण थांबून काळ पाहत होता,
जुने दिवस डोळ्यांमध्ये हळूच परतले होते।।

ती वळून गेली तरी रस्ता सुन्नच राहिला,
वार्‍यावर कितीतरी प्रश्न तसेच उरले होते।।

रविवार, १७/५/२६, १:३० PM
अजय सरदेसाई - मेघ


Saturday, 16 May 2026

टेकडी


ती पुराणी आठवण त्या टेकडीवरती,
धुक्यात गेली विरून त्या टेकडीवरती।

एक कवडसा अलवार उतरला धुक्यातून,
ती तुझीच आठवण होती त्या टेकडीवरती।

धुक्यातून गारवा सरकत आला माझ्या जवळ,
तेव्हा सुर मारव्याचे कानी पडले टेकडीवरती।

किती आठवणी विखुरलेल्या आपल्या त्या टेकडीवरती,
जातेस का गं तुही कधी त्या टेकडीवरती?

दगडांच्या नसलेल्या डोळ्यांत ओळख उमटली,
जेव्हा नजरानजर झाली आमची त्या टेकडीवरती।

पायवाट ती जुनी अजूनही जाते कड्यापर्यंत,
झाला जिथुन स्वप्नांचा कडेलोट त्या टेकडीवरती।

का जावं कोणी पुन्हा चढून त्या टेकडीवरती,
भग्न स्वप्नांची मातीच उरली आता त्या टेकडीवरती।

रविवार, १७/५/२६ , ११:२४ AM
अजय सरदेसाई -मेघ

टिप: टेकडी म्हणजे खरी टेकडी न समजता त्या "आठवणी" आहेत अस समजा आणि पुन्हा वाचा. (टेकडी = आठवणी)

Friday, 15 May 2026

ग्रह नी नक्षत्र - ( वेगळा दृष्टिकोन)


कुठल्या ग्रहाने लिहिले हे भाग्य माझे,
मी स्वतःच ठरवतो मी मार्ग माझे।।

शनि बसो वा राहू येवो डोक्यावर,
थांबणार नाही कधी पाऊल माझे।।

तारे मोजत बसले ते रात्रभर,
मी मात्र पेटवत राहिलो दिवे माझे।।

नक्षत्रांनी आखल्या रेषा आकाशात,
मातीत रुजवत राहिलो बीज माझे।।

म्हणे वक्री शनि, म्हणे अस्त शुक्र,
तरीही हात सोडेना करणे कष्ट माझे।।

ग्रहांची भाषा कळेना मला कधी,
पण कळतात मला श्वास आणि ध्यास माझे।।

दैव जरी असेल लिहिलेले कुणी,
शाई मात्र असेल घामाचे थेंब माझे।।

शुक्रवार, १५/५/२६ , १२:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Thursday, 14 May 2026

ग्रह नि नक्षत्र


कधी मिळणार मला पुरस्कार माझा,
सुखात जगण्याचा अधिकार माझा।।

का ठरवतात आयुष्य ग्रह नि तारे,
का नेहमी संबंध त्यांचा नि माझा।।

शुक्र, शनि, रवी, मंगळ आसनस्थ आकाशी,
का ठरवतात आयुष्याचा वेग माझा।।

लग्न, नक्षत्र, रास, दशांची ही पचडी,
का गुंतवत राहते प्रत्येक मार्ग माझा।।

यांची युती अन् त्यांची शत्रुता म्हणे,
का बदलते वारंवार मार्ग माझा।।

कधी तो मार्गी तर कधी वक्री म्हणे,
यांची लुडबुड वाढवते वैताग माझा।।

दशमारिष्ठ पंचमारिष्ठ ग्रह पुजेतच,
ह्यातच दवडतोय सगळा वेळ माझा।।

हातांच्या रेषांवर विश्वास किती ठेवू,
अजून किती चालणार संघर्ष माझा।।

नशिबालाही कधी विचारावंसं वाटतं,
काय एवढा होता अपराध माझा।।

दैवाच्या नावाखाली थांबून राहू कशाला,
श्वासांत धगधगतो निर्धार माझा।।

अजय सरदेसाई  - ‘मेघ’
शुक्रवार, १५/५/२०२६ — ९:०० AM

मी काही इतका असा…


मी काही इतका असा बेभान झालो,
मीच स्वतःपासून अनजान झालो।।

लोकांना कारणे होती व्यथांची त्यांच्या,
मी मात्र विनाकारण परेशान झालो।।

आरशाशी नजर भिडवायचं धाडस हरपलं,
माझ्याच प्रतिबिंबात मी शैतान झालो।।

नात्यांची गर्दी होती सभोवताली जरी,
आतून मात्र भी फार विराण झालो।।

एक सत्यच होतं जे आयुष्यभर वाट दाखवत राहिलं,
नाहीतर प्रत्येक स्वप्ना मागे मी नादान झालो।।

महफिलीत हसत राहिलो मुखवटा चेहऱ्यावर घेऊन,
मनातून मात्र मी खूप हैराण झालो।।

ज्याला आपलं मानलं तोच दूर निघून गेला,
तरीही त्याच्याच प्रेमात मी कुर्बान झालो।।

“मेघ”, वेळेने एक विलक्षण कला शिकवली,
प्रत्येक वेदनेशीच हळूहळू एकजान झालो।।

— अजय सरदेसाई “मेघ”
गुरुवार, १४ मे २०२६ । ०३:३५ PM

वक्त कुछ ऐसे,,,,,,


 

वक़्त कुछ ऐसे बेगुमान हुआ,
मैं अपने आप से अनजान हुआ।।

लोगों की परेशानियों की वजह होती है,
मैं अपने आप से बेवजह ही परेशान हुआ।।

आईनों से नज़र मिलाने का हौसला न 
हुआ,
मेरा अक्स हर वक्त मुझसे बदगुमान हुआ।।

रिश्तों की भीड़ थी मगर तन्हाई कम न हुई,
हर शख़्स अपने मतलब का मेहमान हुआ।।

एक सच ही था जो उम्रभर रोशनी देता रहा,
वरना हर ख्वाब हर मोड़ पर वीरान हुआ।।

हम हँसते रहे महफ़िलों में यूँ ही मगर,
दिल अंदर ही अंदर कितना सुनसान हुआ।।

जिसे अपना समझा वही दूर जाता रहा,
दिल फिर भी उसी शख़्स पर कुर्बान हुआ।।

“मेघ” वक़्त ने अजब फ़न सिखा दिया,
हर दर्द धीरे-धीरे मेरा अरमान हुआ।।

गुरुवार, १४/५/२६ , १२:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ

रास आता है




अकेले में रोना मुझे रास आता है,
सबको साथ लेकर हँसना रास आता है।।

मैख़ाने में साग़रों की कमी तो नहीं मगर,
मुझे तेरी आँखों से पीना रास आता है।।

सरायों में शायद लज़ीज़ खाना मिलता होगा,
मगर मुझे घर का खाना ही रास आता है।।

बहुत लोग मिलते हैं मतलब से इस जहाँ में,
मुझे बेवजह किसी का मिलना रास आता है।।

"मेघ" दुनिया का अंदाज़-ए-ज़िस्त अलग हो मगर,
मुझे तो अपना अंदाज़-ए-ज़िस्त रास आता है।।

गुरुवार, १४/५/२६‌, ११:२२ AM
अजय सरदेसाई - मेघ

Wednesday, 13 May 2026

ख़्वाहिश




मिलने की है तुझे ये जो ख़्वाहिश, दिल से निकली है,
तुझसे खुलकर बातें करने की कोशिश, दिल से निकली है।।

दिल खोलकर तुझे दिखाने की ख़्वाहिश, दिल से निकली है,
ये मेरे सब्र की आख़िरी आज़माइश, दिल से निकली है।।

कल रात भर चाँद तकता रहा तुझे फलक से,
उस चाँद से मेरी जलन-ओ-रंजिश, दिल से निकली है।।

तेरी ख़ामोश नज़रों में जो इक हल्की सी बारिश है,
उसमें भीग जाने की ये ख़्वाहिश, दिल से निकली है।।

तेरे जाने के बाद भी तेरा एहसास फिर भी ठहरा है,
इस सूने दिल में फिर से धड़कने की कशिश, दिल से निकली है।।

तेरे धड़कनों की लरज़िश मुझे सुनाई देती है,
बेचैनी में डूबी ये हल्की सी ख़्वाहिश, दिल से निकली है।।

मिलो तो  मिरे  अनकहें  लफ़्जों  को भी सुनना 'मेघ',
मेरी हर लरज़ती धड़कन की गुज़ारिश, दिल से निकली है।।

बुधवार, १३ मई २०२६ , ५:३५ PM
अजय सरदेसाई 'मेघ'

हृदायातुन उमटली असेल...






कदाचित ती त्याचीच ख्वाहिश,
हृदयातून उमटली असेल।
ही जीवनाची आर्त फरमाइश,
हृदयातून उमटली असेल।।

झऱ्याची ती छमछम धून,
किंवा सागराची शांतता गहिरी,
ती सृजनाची सुंदर नुमाइश,
हृदयातून उमटली असेल।।

डोळ्यांत दाटलेली ओल,
ओठांवरील ती निःशब्दता,
अंतरीय वेदनेची पैदाइश,
हृदयातून उमटली असेल।।

मातीतून आलो सारे आपण,
मातीतच विरून जाणारे,
ही सनातन जी रवाइश,
हृदयातून उमटली असेल।।

आईच्या त्या प्रार्थना अजुनी,
मनात घुमत राहतात,
त्या आर्त प्रार्थनांची जुंबिश,
हृदयातून उमटली असेल।।

शून्यात हरवल्यागत वाटले,
ते पुन्हा  गवसले कसे ‘मेघ’,
ती परतीच्या प्रवासाची ख्वाहिश,
हृदयातून उमटली असेल।।

बुधवार, १३/५/२६, २:४५ PM
अजय सरदेसाई ‘मेघ'

दिल से निकली होगी...





ये शायद उसकी ख़्वाहिश है, दिल से निकली होगी।
ये ज़िंदगी की फ़रमाइश है, दिल से निकली होगी।।

झरने की वो छमछम हो, या सागर की शांतता,
ये उसके सृजन की नुमाइश है, दिल से निकली होगी।।

आँखों में जो नमी है, होंठों पे जो ख़ामोशी,
ये किसी दर्द की पैदाइश है, दिल से निकली होगी।।

मिट्टी से उठे हम सब, मिट्टी में मिल जाएँगे,
ये उसी की रवाइश है, दिल से निकली होगी।।

माँ की जो दुआएँ थीं, अब भी कहीं गूँजती हैं,
ये रूह की सदाइश है, दिल से निकली होगी।।

शून्य में जो खो जाएँ, वो खोते कहाँ हैं ‘मेघ’,
ये जो वापसी की ख़्वाहिश है, दिल से निकली होगी।।

बुधवार, १३/५/२६ , १:४८ PM
अजय सरदेसाई  ‘मेघ’

अस्तित्व का रहस्य


 

झरना, नदी, सागर, महासागर — सब तो एक ही पानी हैं,

फिर क्यों छमछम, कलकल, घर्रघर्र, ॐ — अलग-अलग कहानी हैं?

मेघ अलग, जल अलग, दोनों के अलग विधान हैं,
फिर क्यों दोनों के आँचल में — एक ही नीला आसमान है?

मिट्टी, पाषाण, वन, पर्वत — सबकी अपनी पहचान है,
फिर क्यों हर कण के भीतर — एक ही मौन निशान है?

सूरज, चंदा, दीपक, जुगनू — सबकी अपनी ज्योति है,
फिर क्यों हर उजियारे में — वही एक लौ होती है?

देह अलग, मन अलग, अलग सभी की माया है,
फिर क्यों रोते क्षण में — हर आँसू खारा पाया है?

जन्म अलग, पथ अलग, अलग सभी की यात्राएँ हैं,
फिर क्यों अंतिम श्वास में — सब शून्य में खो जाएँ हैं?

शायद यही रहस्य है — जिसे सब "अस्तित्व" कहते आए हैं,
एक ही तत्त्व से उठकर हम — फिर उसी में समाए हैं।।

बुधवार, १३/५/२६ , ११:०० AM
अजय सरदेसाई -मेघ