किती वसंत येउनि गेले किती गुलमोहर मोहरूं गेले ,
तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी
किती रांत्री एकल्या वेचिल्या, चंचाला मज रीझवून गेल्या ,
तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी
विरहाचा हा असीम प्याला, एकटाच मी आहे प्यायला .
तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी
मावळत्या ह्या माझ्या मनाच्या, दुखवून गेल्या झुन्या खपल्या
तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी
शरीर ही मझे थकले आता , दृष्टी ही लागली पैलतीरा.
तरी जपून ठेवल्या तुझ्या आठवणी
अजय सरदेसाई (मेघ)
13/09/94 11.45 PM
No comments:
Post a Comment