रिम झिम पडती श्रावण धरा
मनी प्रीतीचा फुलला पिसारा
तनी पसरला गोड शहारा
प्रिया मज कळला तुझा इशारा
न्हाहू पाहती या रिम झिम धरा
मम पदर ढाळीतो चंचल वारा
प्रिया ,थांब जरा
मज कळला तुझा इशारा
काळोख पसरला चरा चरा
मनी विचार मिलनचा पहा बरा ,
एकांत करू हा साजरा
प्रिया , थांब जरा
मज कळला तुझा इशारा.
13/09/94 8:41 PM
No comments:
Post a Comment