मी अबोल आहे, असे तू नेहमी म्हणतेस.
पण… बोलताना तुझ्यासोबत शब्दच अपुरे पडतात.
मग मी बोलत नाही, फक्त तुला पाहतो.
बोलत असतात ते फक्त माझे डोळे.
पण तुझे त्यांच्याकडे लक्षच कुठे असते!
तुझ्या शब्दजंजाळातून तुला वेळ मिळाला तर पाहशील!
अग वेडे, प्रेमाला शब्दांची गरजच नसते.
डोळेही बोलून जातात कधी शब्दांच्या पलीकडले,
पण तू ऐकशील तर खरी!
अग प्रेमात गरज असते ती फक्त डोळ्यांचीच!
डोळसपणे एकमेकांना ओळखण्यासाठी, पारखण्यासाठी…
अग प्रिय व्यक्तीची अविरत वाट पाहतात ते डोळेच,
आणि विरहाने ओले होतात तेही डोळेच.
सुखाने न्हाऊन जातात तेही डोळेच.
इतकेच काय, प्रेमिकांची पहिली भेट घडवून देतात तेही डोळेच ना!
म्हणूनच सांगतो प्रिये— फक्त डोळ्यांनीच बोल.
शब्दांमागे लागू नकोस; शब्द खोटेही असतात.
फक्त डोळे खरे बोलतात,
फक्त डोळेच खरे बोलतात.
अजय सरदेसाई (मेघ)
27/08/1994 7.30
PM

No comments:
Post a Comment