प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 31 August 2013

मुंबई नगरी



इथे लाखांचे खाक़ होती, राखेतून या फिनिक्स ही उड़ती

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

राजा इथे होतो भिकारी, भिकारी ही घालतो सफारी

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

उंच मनोरे इथे झुलती,बॉम्ब स्फोटांच्या छायेत राहती

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

इथे स्वप्नांची असे रेलचेल, तारकांची इथेच मैफिल

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

भ्रष्टाचारी राज्य करती , कष्टकरी जिथे मरती

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

या नगरी ची वेडी दुनिया,या नगरी ची आहे किमाया

इथे मिळे छोकरी मिळे कधीच नोकरी

ही मुंबई नागरी रे मित्रा ही मुंबई नगरी.

 
अजय सरदेसाई (मेघ)
14/09/1994                                         9.30 am
 
 

No comments:

Post a Comment