काळोखाच्या साम्राज्यातून जन्म घेत असते पहाट क्षणो क्षणी
प्रकाशाला गिळून पुन्हा एकदा पुढे सरकतो अंधार क्षणो क्षणी
अविश्वासाच्या भिंती फोडून अवतरतो विश्वास
क्षणो क्षणी
विश्वासाचा बळी घेऊन पुन्हा 'मी' म्हणतो अविश्वास क्षणो क्षणी
दुखा:च्या खोल खायीतून वर येत असते सुख: क्षणो क्षणी
सुख:च्या या संथ जालावर दुखा:चे ही तरंग उठती क्षणो क्षणी
मृत्यूच्या विराट मुखातून जन्म घेत असते जीवन क्षणो क्षणी
जीवन हे पुन्हा एकदा देई मृत्यूस आमंत्रण क्षणो क्षणी
अजय सरदेसाई (मेघ)
19/09/1994 9:00 AM
No comments:
Post a Comment