विचार तुझा मनीं येता,आठवणींच्या उठल्या लाटा
जाग्या झाल्या तरल भावना,उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा
आठवतो मज दिवस तो पहिला, जेव्हा आवळा परिचय झाला
परिचयाच्या वाटेवरुनी,प्रेमाचा अंकुर उमलला
प्रेमाचा हा अंकुर बहरला,बाहेरून शुभमंगल झाला
आठवतो मज अजून सारखा,मिलनाचा तो क्षण पहिला
प्रेमाचा हा तरु मोहरला, आल्या त्याला नव्या पालव्या
आठवतो अजून दिवस तो मजला,दोनाचा जेव्हा त्रिकोण झाला
सुखी आपला संसार चांगला,नजर लागली कसा बिघडला
गेलीस ग तू सोडून अर्ध्यावर, जो सुंदर आपला डाव मांडला
तरीही हा चिमणा एकाला,पाखरांसाठी जगाला श्रमला
उडुनी गेली पाखरें,आता चिमणा राहिला ग एकला
विचार तुझा मनीं येता,आठवणींच्या उठल्या लाटा
जाग्या झाल्या तरल भावना,उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा
अजय सरदेसाई (मेघ)
१४/०९/१९९४ , ०८:३० PM
No comments:
Post a Comment