त्यावेळी जिकडे तिकडे चारोळ्यांचे
पेव फुटले होते . जोतो चारोळ्या करत फिरत असे. चारोळ्या मित्रांना म्हणून दाखवत असे
. काही ओरिजिनल असत , काही इन्स्पायरड असत , तर काही चक्क कॉप्या असत व आपल्या नावावर
खपवल्या जात . पण तरीही चारोळ्या ऐकण्यात , करण्यात आणि मित्रांमध्ये ऐकवण्यात एक वेगळीच
मौज असे . अशाच त्या मंतरलेल्या कॉलेज च्या दिवसांत काही सुचलेल्या ,काही इन्स्पायरड चारोळ्या फक्त तुमच्या
साठी . ओडून ताणून कलेल्या ,काही र ला र , ट ला ट जोडून जुळवून आणलेल्या, तर काही सरस जमलेल्या . पहा आवडतात का !
नाही आवडल्या तरी चारोळ्याच त्या , टाईम पास झाल्याशी कारण ........ काय ?
चारोळ्या.......
20/09/1994 12:30 PM
राम हि खोटा
होता
, खोटी
त्याची
कहाणी
. ते
संत
हि
खोटे
होते
, खोटी
त्यांची
वाणी
,
फक्त मृत्यूच एक
सत्य
या
जगात
,हे
जीवन
मात्र
, आळवा वरचे
पाणी
!
20/09/1994 6:55
PM
वैरयांच्या
शब्दात
आज
मध
मिसळलाय!,बाभळीच्या
काट्यात
आज
गुलाब
उमलाय
!
सुर्य
उगवलाय
आज
कुणीकडे
?अबोलीत
आज
सुगंध
फुललाय
!
20/09/1994 10:45 PM
ओठांत मदिरा अन नैन
शराबी
,जीवनात
नाही
या
काहीच
खराबी
.
आकंठ पिऊ दे
मज
जीवनाचा
प्याला
,गुत्यातून
उठला
खूप
उशिरा
हा
शराबी
.
21/09/1994 12.30
AM
हि रात्र
निळी चांदण्यांच्या शालूत आली.
रातराणीच्या गंधात डुंबून
आली .
फिरविला कुणिरे मनांत
मोरपंख ?अन याद
तुझी हळूच डोकावून
गेली.
21/09/1994 12:35 AM
जीवनीची रीत आशीच
असते
,खिडकी
पल्याड
जग
सुंदरच
दिसते
!
तो आहे अनाडी
, सांग
त्या वेड्याला ,प्रत्येक पेल्यात
एक
वादळ
असते
!
21/09/1994 12:50
त्यांनी
मांडला
शिक्षेचा
बझार
,सिस्टम
हा
शिक्षणाचा
जर्जर
पण
कोण तमा बाळगतो याची ,नोकरी
एक
अन
हजांरो
बेकार
21/09/1994 3:20 PM
मेल्यावर मी बंधू
नका
बूथ
,आठवणी
माझ्या
ठेवू
नका
शाबूत
पण इतकेच करा
दोस्तानो
माझ्या
साठी
,अस्थींची
बनवून
माझ्या
विट
, बसवा
गुत्याच्या
भिंतीत
21/09/1994
3:35 PM
विचारांच्या
दुनियेत
हरवलायेस
दोस्त
,कवितांच्या
दुनियेत
रामलायेस
दोस्त
.
तू
सोडून
दे
या
भाकड
कवी
कल्पना
,खर्या
दुनियेची
ओळख
विसार्लायेस
दोस्त.
29/09/1994 12:50 AM
हि वाट पायाखालची
का कधी संपली
आहे ? वाटेवरचा प्रत्येक मुसाफिर नेहमीच दमला
आहे !
हि नाही वाट
, तो आहे कालसर्प
!वाटेतच वाटेने सर्वांना
गिळले आहे !
31/01/1995 9:30 PM
|
31/01/1995
|
स्वप्नांना
वास्तवाचा
पायबंध असतो
आनंदाला
सतत
दुखा:चा
डंख
असतो
नको
होवूस
तू
या
जीवनाला
निराश
निराशेला
आशेचा
पंख
असतो
|
Dreams are bound by chains of
reality
Happiness is sprinkled with
salts of sorrow
Never be downcast with life my
friend
For hope comes on wings of
morrow
|
31/01/1995 9:35
PM
जीवन एक
अथांग सागर आहे
,जगणे एक सागर
सफर आहे
सफरीची सुरुवात
आहे तुझा जन्म
, सफरीच्या अंती मृत्यूची
किनार आहे
01/02/1995 1:30 AM
शब्दांनी शब्द रेखा शब्दांच्या
, शब्दांनीच शब्द उणे शब्दांना
शब्दांनीच शब्दांची शब्द भरारी
,शब्दांनीच शब्दांची किंमत शब्दांना
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment