प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 5 September 2013

शब्द


शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार ,शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार 
शब्दांनी केले शब्दांना साकार ,शब्दांनीच दिला शब्दांना आकार 
शब्दांची घरटी शब्दांचा संसार ,शब्दांनीच केला शब्दांचा संहार 
शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी कधी शब्दांची कोटी 
शब्दांचा आभास निश्वास शब्दांचा ,शब्दांचेच प्रेम दुस्वास शब्दांचा 
शब्दांनीच घातल्या टोप्या शब्दांना , शब्दांचीच मात्र लागू पडे शब्दांना 
शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मिंदे आहेत शब्द अव्यक्त 
भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया
शब्द गोड नी कटू शब्द ,शब्द खरे नी खोटे शब्द 
शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची 
शब्द "पुढे" शब्द "मध्ये" नी "मागे" शब्द 

बुधवार दिनांक : ०१/०२/१९९५    , ०१:२० AM
अजय सरदेसाई (मेघ ) 

No comments:

Post a Comment