प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Sunday, 10 March 2024

मला सांगा


 

मला सांगा आयुष जे म्हणतात नक्की काय असतं

भुत-स्मरणं वर्तमान रमणं आणि भविष्य रंजनं असतं।।


प्रत्येकाला जे हवं हवंस वाटतं ते सुख मिळवणं म्हणजे तरी काय असतं।

आम्रवृक्ष छायेत नदी काठी शितल वाऱ्यावर नातवंडांना खेळवणे असतं।।


पटलं तर पहा हे दुःख-दुःख जे म्हणतात ते काय असतं।

सर्व असुन ही ज्यांत समाधान नसतं ते आणि काय असतं।।


जागा मध्ये जे प्रेम प्रेम म्हणतात ते तरी काय असतं।

दुसरं काही नाही अहंकार टाकुन तिथे समर्पण असतं।।


मला सांगा निवृत्ती म्हणजे तरी नक्की काय असतं।

मिळवले जे ते टिकणार नाही हे स्वीकारणं असतं।।


सांगा बरें मुक्त असणं म्हणजे हो नक्की काय असतं।

निरिच्छ वासना रहीत जगणं असतं दुसरं काय असतं।।

 

रविवार , १०/०३/२०२४ , ०१:२५ PM

अजय सरदेसाई (मेघ )

No comments:

Post a Comment