तुझ्या स्मरणांचे हृदयातले पान जीर्ण झाले आता
भेटून पुन्हा नव्याने ती जुनी ओळख करू ताजी आता
तुझ्या आठवांचे स्मरण चित्र पुसट झाले आहे
मोगऱ्याचा स्मृतिगंध तुझा तरी श्वासांत आहे
तू गायल्या गीतांची झाली विरळ लकेर आता
आपल्या नात्याची ओळख कशी दाखवू आता
कॉलेज च्या चौका समोरचे कॅफे आहे तिथेच
विद्यार्थ्यांची गर्दी तशीच,फक्त नाही तू नी मीच
हे सर्व घट्ट पकडून ठेवले तरी चालले निसटून
काय करू,आणू कसे जे गेले क्षण विसरून
कधी तरी तुला आठवतात का ते दिवस जे गेले निघून
की क्षण काही सोडता बाकी सारे तुही गेली विसरून
तुझ्या स्मरणांचे हृदयातले पान जीर्ण झाले आता
भेटून नव्याने ती जुनी ओळख करू ताजी आता
मंगळवार , २६/०३/२०२४ १२:२५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment