प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 25 March 2024

कैवल्य तरी ते गवसले नाही


 

मज दुःखा चे वावडे नाही

की सु:खा ची कांक्षा नाही

अंता ची आहे जाणिव 

मात्र मृत्यू चे भय नाही

काटे अनेक रुतले मनात

तरी हृदयांत वेदना नाही

जरी दुखावले मन माझे

कोणतीही कटुता नाही

जीवनाची वाट आहे कठिण

मात्र सोबत कुणी ही नाही

रात्र संपत आली तरी ही

या प्राचीस तरी सुर्य नाही

तो जरी म्हणवतो मित्र माझा

पण मज तो ओळखत नाही

फुले वेचली बकुळी ची

का त्यांना सुगंध नाही

आयुष्य चालले पुढे सरकत

दिशा मात्र का अजूनही नाही

देव्हारा हृदयाचा का रिकामा

देवा ची प्रतिष्ठा अजुन ही नाही

समाधी लागली केव्हाच देहाची

कैवल्य तरी ते गवसले नाही


सोमवार  २५/०३/२०२४    , १५:१५ PM

अजय सरदेसाई (मेघ )


No comments:

Post a Comment