प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 28 March 2024

अश्वत्थ-विहीर



एका रस्त्याच्या कडेला विहीर आहे

लगतच एक गर्द हिरवा अश्वत्थ आहे

त्या विहिरीचा डोह खूप खोल आहे

गार उदक तिचे पिण्यास गोड आहे

वैशाखात जेव्हा सूर्य आग ओकतो

अश्वत्थ तेव्हा थंड कृष्ण छाया देतो

मिटवून तृष्णा पांथस्थ मार्गी जातो

लोकांस ती दोघे जणू विठ्ठल रख्माई

पुंडलिक भेटीस उभी विठू-रख्माई

 

शुक्रवार , २९/०३/२०२४  १०:५५ AM

अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment