तुझ्या नी माझ्या भेटी गाठी
डोळ्यांत सखे दिठी दिठी
पहा झाडां वर सांजवेळी
काजव्यांचे ग दिवे किती
मन वेल्हाळ, वेल्हाळ मती
हृदयांत चांदण्यांचे झरे किती
एकच उत्तर सखे मम ओठी
तरी विचारतेस मज प्रश्न किती
प्रारब्ध संचित माझे का असे
जवळी तु, तरी तूच दुर किती
सोमवार ०१/०४/२०२४ ,०५:५६ PM
अजय सरदेसाई (मेघ )
दिठी दिठी = नजरेतल्या नजरेत,
वेल्हाळ
= वेडं
मती
= बुद्धी
प्रारब्ध
= नशीब , Destiny
संचित
= साठवलेले , जमा झालेले
No comments:
Post a Comment