प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 1 April 2024

शिकत असतो आयुष्यातून नवीन काही



पन्नाशी माझी उलटुन गेली
साठी अजुन आली नाही
 

माझी अक्कल म्हणून तरी
साठी
 ‘अक्कल नाठी’ झाली नाही

 
खरं सांगायचं माझ्या मित्रांनो तर
मी वय गृहीत कधी धरलच नाही
 
हे आयुष्य माला आज सुद्धा
शिकवायचं  नवं सोडत नाही
 
रोज रोज मी शिकतच असतो
माझ्या आयुष्यातुन नविन काही

 

सोमवार०१/०४/२०२४ ,०७:५७ PM

अजय सरदेसाई (मेघ)

 


No comments:

Post a Comment