निजलो असता, माझे स्वप्न न जाणे कुठे हरवले,
निजेतून येताच जाग, कोठे ची ते न मज सापडले .
किती सुंदर होते स्वप्न जे मी उराशी बाळगले,
कोणी शोधून द्याल का ,माझे स्वप्न जे हरवले.
रात्रीच काल पाहीले होते मी त्यास झोपे आडून ,
झोपताच गाड मी नेले त्यास कोणी चोरून?
रंगबिरंगी होते ते,त्यास उडण्यास पंख होते,
ते उडत,बागडत तर नाही ना गेले कोठे?
विसरले तर नाही ना ते,कोठे आपले घर होते?
कुणी शोथुन द्या हो ,जे सुंदर माझे स्वप्न होते.
शुक्रवार, ०५/०४/२०२४ ०१:०९ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment