शळा सुटली पाटी फुटली पाऊसाने वाजवली सुटृटीची घंटा।
डबक्या डबक्यातुन ऐकु येत आहे बेडकांचा तंटा ।।१।।
पाऊस घणाणुन गेला आसमंत स्वच्छ झाले।
नागमोडी वळणांवर कागदी होड्यांचे डोलारे ।।२।।
दुर डोंगरांवर काळे ढग अलगद येऊन उतरले ।
डोंगरतुन वाहुन पाणी,नदीत पोहण्यास उतरले ।।३।।
पाण्यातल्या कागदांच्या होड्या नकळत कुठे वाहुन गेल्या।
कागदाच्याच त्या, वाटते वाहत्या पाण्यात बुडून गेल्या।।४।।
चिखलातून चालतांना सर्वांची होते मोठी कसरत ।
झाडांवर नाचतो जैसा एखादा खट्याळ मरकट।।५।।
बुधवार , २०/०३/२०२४ ३:०० PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment