प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday, 28 February 2024

छेडिल्या कुणी सतारीच्या तारा


सांजवेळी अवचित छेडिल्या कुणी सतारीच्या तारा ।

मन माझे धुंद करुन गेला तो मंद स्मृतीगंध वारा ।।


अजुनही तूझा स्पर्श आठवुन उन्मादीते अंग

रोमांच दाटते,अंगातून उठतो एक शहारा।।


तु एक शीतल नदी अन् मी तुझा किनारा।

एक दिस सुटणार साथ मिळणार तू सागरा ।। 


चालू चल काही काळ गुंफून हातात हात।

मावळतीस आला पहा तो शुक तारा ।।


मनातल्या प्रश्नांची तू आज उत्तरं शोध सखे

साचल्या गढुळतेचा स्वच्छ होऊदे पसारा ।।


अंगणात मंद मंद झुलतो शांत गार वारा।

मोरपंखी भावनांचा मनी फुलला पिसारा ।।


डोळ्यांत तुझ्या मी देखिले प्रतिबिंब माझे।

हृदयांत तुझ्या मनस्विने मी शोधतो निवारा ।।


हे बंध रेशमाचे आपल्या नात्यांत गुंफलेले

चल प्रेमगीत गाऊ हळुवार छेडून हृदयीच्या तारा ।।

 

बुधवार , २८//२०२४ , ०८:२२ PM

अजय सरदेसाई (मेघ )


No comments:

Post a Comment