प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 24 February 2024

कशी वर्णु मी ती रात्र ?


 

तोकड्या शब्दांनी माझ्या कशी वर्णु मी ती रात्र 
दोन तनुंच्या अंगारात धगधगती ती मखमली रात्र ।।१।।
 
गात्रांतून ओथंबून वाहते एक बेभान रणरणती ओढ 
विसरु म्हणता विसरत नाही ती स्फुलिंगणारी रात्र ।।२।।
 
चमचमणाऱ्या ताऱ्यां खाली तळमळणारी आस 
तिमीरी पांघरुणाखाली लखलखती शृंगारिक रात्र ।।३।।
 
दोन जीवांच्या मिलनाचा उफान भोगविलास 
प्रेमपुर्तीच्या तृप्त गात्रांनी थकुन झोपली रात्र ।।४।।
 
शनिवार २४//२०२४ , :५७ PM
अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment