प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....
Showing posts with label Marathi Gazal. Show all posts
Showing posts with label Marathi Gazal. Show all posts

Saturday, 6 September 2025

🎼 मराठी ग़ज़ल : छटा वेगळ्या


मतला:

मजकूर तोच, छटा वेगळ्या।

साध्य तेच, तर्‍हा वेगळ्या।।

 

शेर २:

गुलाब सारेच सुवास भरती।

पाकळ्यांच्या छटा वेगळ्या।। 

 

शेर ३:

जीवन चक्राच्या आऱ्यांतून । 

सुख-दु:खांच्या कथा वेगळ्या।।

 

शेर ४:

आभाळ तेच, तारे तेचि।

तारकांच्या दशा वेगळ्या।।

 

शेर ५:

धर्म एक, जगी 'आदर' तो।

धर्माचरणी कथा वेगळ्या।।

 

मकता:

मेघ’ जाणतो सत्य एकच।

लोकांच्या परिभाषा वेगळ्या।।

 

शुक्रवार,५/९/२५ , २:५२ PM

अजय सरदेसाई -मेघ


Friday, 5 September 2025

मराठी ग़ज़ल: मेघ


मतला:
रुंदावल्या कक्षा, सोडल्या आशा, भुर्रकन उडून गेलो।
आकाशात चांदणी एक, तिचा चंद्र होऊन गेलो।।

शेर २:
सुटल्या गाठी, तुटले पाश, मी कृतार्थ होऊन गेलो।
आयुष्य झाले सुंदर, मी विमुक्त होऊन गेलो।।

शेर ३:
धुसर क्षितिजावर उमटले रंग, मी हरखून गेलो।
पहाटेच्या मंद वाऱ्याला, गुपितं सांगून गेलो।।

शेर ४:
निरभ्र नभातून ओघळले गीत, मी गाऊन गेलो।
त्या सुरांत पुन्हा, स्वतःला सापडून गेलो।।

शेर ५:
अश्रूंच्या सरींनी धुतले दु:ख, मन झाले निर्मळ।
अंतरीच्या वेदना विरल्या, पुन्हा मी फुलून गेलो।।

मकता:
‘मेघ’ नभात मनसोक्त विहरुन, मोहरुन गेलो।
पावसाच्या थेंबात स्वतःला, अखंड भेटून गेलो।।

शुक्रवार,५/९/२५, ११:४८ PM
अजय सरदेसाई -मेघ

Wednesday, 3 September 2025

मराठी ग़ज़ल : ही रात्र चांदण्यांचा शालू लेऊन आली


मतला:
ही रात्र चांदण्यांचा शालू लेऊन आली।
ही रात्र मिलनाचा संकेत घेऊन आली।।

शेर २:
वाऱ्याच्या कुजबुजीत रातराणीचा गंध मिसळला।
मनातली आस पुन्हा उमलून आली।

शेर ३:
डोळ्यांत तुझ्या प्रेमाचा उन्मादही चढला।
जणु भरतीची लाट किनाऱ्याशी खेळून आली।।

शेर ४:
स्पर्शाने तुझ्या थरारले माझे सारे अंग।
नवी स्वप्नं घेऊन रात्र पुन्हा रंगून आली।।

मकता:
‘मेघ’ म्हणे ह्या क्षणांचा मोह जपुन जरा।
नवी पहाट अकल्पीत भेट घेवून आली।।

बुधवार, ३/९/२५ ,४:४१ PM
अजय सरदेसाई -मेघ

Tuesday, 26 March 2024

वेळ बिछडण्याची आहे


 

डोळ्यांत तुझ्या एक स्वप्न आहे

ओठांत तुझ्या माझे गीत आहे

दिसते तू जशी चंद्रकोर नभात

प्रेमात तुझ्या तो ईश्वर ही आहे

डोळे मिटूनी मी चांदणे स्मरतो

चांदण्यात तुझीच ज्योत आहे

कुंद भावनांचा झरा वाहतो एक

स्त्रोत त्याचा तुझ्या हृदयांत आहे

ती रात्र सारी सरली मिठीत तुझ्या

मावळतीस पूर्वेला शुक्र तारा आहे

कोंडला श्वास अवचित, हुंदका फुटला

जाणतो सखे वेळ बिछडण्याची आहे

 

मंगळवार , २६/०३/२०२४  , ०५:०५  PM

अजय सरदेसाई (मेघ)

Sunday, 10 March 2024

जुन्या स्मरणांचे चांदणे विरत आहे


जुन्या स्मरणांचे चांदणे विरत आहे।

प्राची ला पहा तो नवसुर्य उगवतो आहे।।

 

तिमीर रात्र ती दुखांची सरली आता।

क्षितिजावर सुखाची लाली पसरत आहे।।

 

दिशा समृद्धी च्या तिष्ठत बघती वाट।

ध्रुवीय वारा मज हे आमंत्रण देत वाहे।।

 

मन घेई गरुड भरारी उंच आकाशात।

पंखात माझ्या निश्चयाचे बळ आहे।।

 

आकाशांत उडतो मी झुंज देत मेघांशी।

दृष्टीत तरी माझे ते इवले घरटे आहे।।

 

सोमवार, ११/०३/२०२४ , १२:२४ AM

अजय सरदेसाई (मेघ )

 

प्राची = पूर्व दशा

तिमीर  =अंधार

ध्रुवीय वारा = पूर्वेकडून वाहणारे वारे

Monday, 26 February 2024

कृष्ण "मेघ"


 

मी कृष्ण "मेघ", आकाशी विहरुन झाले।

बरसुन आसमंती ते विरणे जगुन झाले।।


भिरभिरला हळुवार नभातून थंड शांत वारा।

गहिवरला नकळत "मेघ",आकाश फिरुन झाले।।


डोंगर दऱ्यां शी माझे आजन्म मैत्र आहे।

त्या दाट हिरवळीशी हितगुज करुन झाले।।


त्या वाळवंटास शुष्कतेचा का जडला विकार।

मुसमुसुन माझे तेव्हा कितीदा रडून झाले।।


आशेनै पाहात होता मज तो बळीराज एकटक।

फोडून वक्ष धरणीचा त्याने स्वप्न पेरुन झाले।।

 

सोमवार, २६//२०२४ , :५० PM

अजय सरदेसाई (मेघ)

Saturday, 24 February 2024

कशी वर्णु मी ती रात्र ?


 

तोकड्या शब्दांनी माझ्या कशी वर्णु मी ती रात्र 
दोन तनुंच्या अंगारात धगधगती ती मखमली रात्र ।।१।।
 
गात्रांतून ओथंबून वाहते एक बेभान रणरणती ओढ 
विसरु म्हणता विसरत नाही ती स्फुलिंगणारी रात्र ।।२।।
 
चमचमणाऱ्या ताऱ्यां खाली तळमळणारी आस 
तिमीरी पांघरुणाखाली लखलखती शृंगारिक रात्र ।।३।।
 
दोन जीवांच्या मिलनाचा उफान भोगविलास 
प्रेमपुर्तीच्या तृप्त गात्रांनी थकुन झोपली रात्र ।।४।।
 
शनिवार २४//२०२४ , :५७ PM
अजय सरदेसाई (मेघ)

Tuesday, 23 January 2024

मी कुठे जात आहे


तो सुर्य पहा नभात आणि प्रतिबिंब डोहांत आहे

कोण सत्य कोण मिथ्य हा एकची प्रश्न आहे ।।


अरे वेड्या मनारे हा काय प्रश्न झाला।

जो जास्त ताप देतो तोची सत्य आहे ।।


भ्रम सहज होतो नलगे रे सायास फार

सत्य कटू  फार कठिण पचण्यास आहे।।


चांदण्या चमकती हळुवार भोभाटा नाही फार

पण गर्भात रे त्यांच्या नव विश्व निर्मीती आहे।।


हा सुर्य दिसे तेजस्वी,ओजस जोवर डोळ्यांत

मिटताच डोळे जाणो, मी कुठे जात आहे ।।

 

मंगळवार, २३//२०२४ , :१५ PM

अजय सरदेसाई (मेघ)