तो सुर्य पहा नभात आणि प्रतिबिंब डोहांत आहे ।
कोण सत्य कोण मिथ्य हा एकची प्रश्न आहे ।।
अरे वेड्या मनारे हा काय प्रश्न झाला।
जो जास्त ताप देतो तोची सत्य आहे ।।
भ्रम सहज होतो नलगे रे सायास फार ।
सत्य कटू फार कठिण पचण्यास आहे।।
चांदण्या चमकती हळुवार भोभाटा नाही फार ।
पण गर्भात रे त्यांच्या नव विश्व निर्मीती आहे।।
हा सुर्य दिसे तेजस्वी,ओजस जोवर डोळ्यांत ।
मिटताच डोळे न जाणो, मी कुठे जात आहे ।।
मंगळवार, २३/१/२०२४ , ९:१५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment