तुझ्या प्रिती च्या बकुळ फुलांनी गुंफलेल्या आठवणी ।
त्या जिवलग हळुवार क्षणांनी विणलेल्या आठवणी ।।
हिंदोळ्यावर तु उंच झुलावे, माझे मन ही हिंदोळा व्हावे।
आकाशी तू अलगत झेपतांना टिपलेल्या आठवणी।।
जणू हिरवी पैठणी जेव्हा रानांत मोर नाचे श्रावणी।
ती पैठणी तू नेसतांना हृदयांत साठल्या आठवणी।।
तू यमन आळवावा मी सुरांत तुझ्या सूर मिसळावा।
मावळतीच्या यमन रंगांत मिसळलेल्या आठवणी।।
रात्र सारी जागून सरली पहा उगवला शुक्र तारा ।
मादक स्पर्शांनी तुझ्या गंधाळलेल्या आठवणी।।
जगापासून दूर यावे ,डोंगर दऱ्यांत हरवून जावे।
आपल्याच आवाजांच्या प्रतिध्वनीत आठवणी।।
गुरुवार , १८/०१/२०२४ , १०:२५ AM
अजय सरदेसाई ( मेघ )
🌹💕🥀💐💕🥀💐🌹💕🥀💐🌹💕🥀💐
गायत्री : ही कविता तुझ्यासाठी
🌹💕🥀💐💕💕🥀💐🌹💕🥀💐🥀💐💕
No comments:
Post a Comment