मतला:
रुंदावल्या कक्षा, सोडल्या आशा, भुर्रकन उडून गेलो।
आकाशात चांदणी एक, तिचा चंद्र होऊन गेलो।।
शेर २:
सुटल्या गाठी, तुटले पाश, मी कृतार्थ होऊन गेलो।
आयुष्य झाले सुंदर, मी विमुक्त होऊन गेलो।।
शेर ३:
धुसर क्षितिजावर उमटले रंग, मी हरखून गेलो।
पहाटेच्या मंद वाऱ्याला, गुपितं सांगून गेलो।।
शेर ४:
निरभ्र नभातून ओघळले गीत, मी गाऊन गेलो।
त्या सुरांत पुन्हा, स्वतःला सापडून गेलो।।
शेर ५:
अश्रूंच्या सरींनी धुतले दु:ख, मन झाले निर्मळ।
अंतरीच्या वेदना विरल्या, पुन्हा मी फुलून गेलो।।
मकता:
‘मेघ’ नभात मनसोक्त विहरुन, मोहरुन गेलो।
पावसाच्या थेंबात स्वतःला, अखंड भेटून गेलो।।
शुक्रवार,५/९/२५, ११:४८ PM
अजय सरदेसाई -मेघ
No comments:
Post a Comment