प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 13 September 2025

ग़ज़ल: ग़ज़ल


हे दुःख नव्हे,शब्दांनी जे व्यक्त आहे।
ही आर्तता शब्दांची आहे,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

मनातली एक स्वप्न सुंदरी येथे प्रकटली आहे।
अलंकृत शब्दांनी आहे ,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

मी तिला नी ती मला कधी न भेटलो आधी।
भेट फक्त शब्दांची आहे,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

शब्दांनी बांधली तिला,एरव्ही ती न वश कुणाला।
शब्दांवाचून जी निसटली आहे ,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

'मेघ',लय, काफिया,रदिफ हस्तक ज्याचे।
ती, त्याचीच आहे,वेड्या ही ग़ज़ल आहे।।

शनिवार, १३/९/२५ ,११:३० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment