प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday, 12 September 2025

कदाचित -२


 

तु एकदा आली होतीस छतावर हळुच।
तुझ्या रुपास चंद्राचं चांदणे लाजले कदाचित।।

ते यमदूत माझ्या समोरुन गले एकदा।
त्यांनी मला नाही ओळखले कदाचित।।

त्याला पाहुन डोळ्यांत आले पाणी।
शब्द फुटले नाहीत,रोडावले कदाचित।।

अंधारात या आशेचा दिवा लावून।
मी मुर्त क्षणांना शोधले कदाचित।।

'मेघ', गणगोत पकडून ठेव घट्ट ।
पहा लागेबांधे विस्कटले कदाचित।।

शुक्रवार, १२/९/२५ ,७:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment