मन वेल्हाळ वेल्हाळ,
जसा वारा फांद्यांवर।
क्षणभर थांबे येथे,
क्षणभरांत उडे दूरवर।।
जसा वारा फांद्यांवर।
क्षणभर थांबे येथे,
क्षणभरांत उडे दूरवर।।
मन वेल्हाळ वेल्हाळ,
जसं फुलपाखरू फुलांवर।
फिरे मकरंद चाखत ,
या फुलावरुन त्या फुलावर।।
मन वेल्हाळ वेल्हाळ,
जसा ढग आभाळावर।
क्षणी निळाईत तरंगे,
क्षणी विरुन जाई पार।।
मन वेल्हाळ वेल्हाळ,
जसा गहु जात्यावर।
मन सतत दळत दळत,
येई तेव्हा भावनांचा पूर।।
मन वेल्हाळ वेल्हाळ,
जसा हात फिरे पेटीवर।
बोटे कळ्या दाबत दाबत
येती तेव्हा पेटितुन सुर।।
बुधवार, ३/९/२५ , ५:३० PM
अजय सरदेसाई -मेघ
🌬 वार्याची चंचलता
🦋 फुलपाखराची कोमलता
☁ ढगांची स्वैरता
🌾 जात्यावरची चिंतनशीलता
🎼 पेटीवरील सूर – मनाचा मधुर नाद
No comments:
Post a Comment