प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 19 September 2026

विलक्षण रात




त्या रात्री वाऱ्याची वरात होती
काय सांगू, विलक्षण रात होती

शब्दावाचून संवाद चालत होता
शब्दांशी जवळीकही सलत होती

रातराणीचा गंध पसरला होता
धुक्याची चादर विरत होती

आठवणींचा झोका झुलत होता
भूतकाळाची सावली सरत होती

ओठांवरच प्रश्न विरत होता
मौनातच उत्तरे मिळत होती

शनिवार, १९/९/२६, ४:२१ PM
अजय सरदेसाई — मेघ

No comments:

Post a Comment