प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 24 September 2026

बाकी आहे...




एक युग सरून गेले, भेट आपली होऊन,
हृदयात त्या दिवसांची आठवण बाकी आहे।

आता तुला मिळविण्याची इच्छा उरली नाही,
तरी तुझ्या भेटीची ओढ अजून बाकी आहे।

हळूहळू वयाचीही संध्याकाळ होत आहे,
तरी तुझे मनातून जाणे अजून बाकी आहे।

पुन्हा जन्म घ्यावा लागू नये, हीच भीती मनात,
कारण तुझ्या भेटीची आस अजून बाकी आहे।

कॉलेजच्या त्या दिवसांत आपण भेटत होतो,
त्या सुंदर दिवसांची स्मृती अजून बाकी आहे।

त्या काळाच्या काही सुंदर सौगाती जपल्या आहेत मी,
त्या सौगाती तुला परत करणे अजून बाकी आहे।

बुधवार, २३/९/२६, ७:३० PM
अजय सरदेसाई — मेघ

No comments:

Post a Comment