प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday, 28 February 2024

छेडिल्या कुणी सतारीच्या तारा


सांजवेळी अवचित छेडिल्या कुणी सतारीच्या तारा ।

मन माझे धुंद करुन गेला तो मंद स्मृतीगंध वारा ।।


अजुनही तूझा स्पर्श आठवुन उन्मादीते अंग

रोमांच दाटते,अंगातून उठतो एक शहारा।।


तु एक शीतल नदी अन् मी तुझा किनारा।

एक दिस सुटणार साथ मिळणार तू सागरा ।। 


चालू चल काही काळ गुंफून हातात हात।

मावळतीस आला पहा तो शुक तारा ।।


मनातल्या प्रश्नांची तू आज उत्तरं शोध सखे

साचल्या गढुळतेचा स्वच्छ होऊदे पसारा ।।


अंगणात मंद मंद झुलतो शांत गार वारा।

मोरपंखी भावनांचा मनी फुलला पिसारा ।।


डोळ्यांत तुझ्या मी देखिले प्रतिबिंब माझे।

हृदयांत तुझ्या मनस्विने मी शोधतो निवारा ।।


हे बंध रेशमाचे आपल्या नात्यांत गुंफलेले

चल प्रेमगीत गाऊ हळुवार छेडून हृदयीच्या तारा ।।

 

बुधवार , २८//२०२४ , ०८:२२ PM

अजय सरदेसाई (मेघ )


Tuesday, 27 February 2024

श्वासांत भरुन उरावे

 

वाटते मना एकदा तरी स्वच्छंद मी जगावे

वाहणाऱ्या वाऱ्या समे सर्व दिशांना फिरावे ।।


कवी झालोच कधी तर वाटते बाकीबाब व्हावे

विश्वमनाच्या गुढ गर्भातून काव्य मोती मी वेचावे ।। 


मृदु कुसुम कळी सम त्या जिवन माझे ही फुलावे

जैसे सुरवंटाचे फुलपाखरु होऊन रानी वनी उडावे।।


सळसळत्या नदी किनारी थरथरती पर्णपाती।

हा देखवा पाहुनी डोळा वाटे पुन्हा प्रेम करावे ।।


आकाश पटलावर चित्रकार कोण विविध रंग भरतो।

मी ही आयुष्यात कुणाच्या ऐसे सुंदर रंग भरावे ।।


आयुष्य जरी संपले माझे तरी मी आठवांत असावे।

पारिजातकाचा गंध होऊनी श्वासांत भरुन उरावे।।

 

बुधवार, २८//२०२४ , १२:२५ PM
अजय सरदेसाई (मेघ)


बाकी बाब तुज्यो पैंजणा


"आनंद यात्री" , गोमांतक हृदय सम्राट , कविवर्य बा. भ. बोरकर यांना समर्पित



एका तिनसना तुका याद आयली तिची गो पैंजणा
म्हज्या कानां अजून घालता साद तिच गो पैंजणा
हांव वडाच्या कडेन चलतां , रान बी मौनच आसता 
म्हज्या कानां तरी छमछम वाजतात तिची गो पैंजणा
"बाकी" तुवें केले एक काव्य "पैंजणा" ताचे नाव 
मनांत दाटलो म्हज्या नकळत एक अनामिक भाव 
वडफळांच्यो अक्षतां हांव वडा सकैल अजून सॉदतां
भाबडो कल्पना विलास तों हांव जाणा तें बाकी बाब 
तरी मका खुणाइतां "बाकी" तो वड आणि पैंजणा
म्हज्या ही जिण्याची आतां सांज जवळ आयली 
तरी किणकिणतांत म्हज्या कानां
तुज्या त्यां कवितेतल्यो तीच्यो  "पैंजणा "

(Youtube video link of the poem sung by Dr. Ghanshyam Borkar who is B, B, Borkar's nephew )

मंगळवार , २७ /२/२०२४ , ९:२८  PM
अजय सरदेसाई (मेघ )

Monday, 26 February 2024

कृष्ण "मेघ"


 

मी कृष्ण "मेघ", आकाशी विहरुन झाले।

बरसुन आसमंती ते विरणे जगुन झाले।।


भिरभिरला हळुवार नभातून थंड शांत वारा।

गहिवरला नकळत "मेघ",आकाश फिरुन झाले।।


डोंगर दऱ्यां शी माझे आजन्म मैत्र आहे।

त्या दाट हिरवळीशी हितगुज करुन झाले।।


त्या वाळवंटास शुष्कतेचा का जडला विकार।

मुसमुसुन माझे तेव्हा कितीदा रडून झाले।।


आशेनै पाहात होता मज तो बळीराज एकटक।

फोडून वक्ष धरणीचा त्याने स्वप्न पेरुन झाले।।

 

सोमवार, २६//२०२४ , :५० PM

अजय सरदेसाई (मेघ)

Saturday, 24 February 2024

कशी वर्णु मी ती रात्र ?


 

तोकड्या शब्दांनी माझ्या कशी वर्णु मी ती रात्र 
दोन तनुंच्या अंगारात धगधगती ती मखमली रात्र ।।१।।
 
गात्रांतून ओथंबून वाहते एक बेभान रणरणती ओढ 
विसरु म्हणता विसरत नाही ती स्फुलिंगणारी रात्र ।।२।।
 
चमचमणाऱ्या ताऱ्यां खाली तळमळणारी आस 
तिमीरी पांघरुणाखाली लखलखती शृंगारिक रात्र ।।३।।
 
दोन जीवांच्या मिलनाचा उफान भोगविलास 
प्रेमपुर्तीच्या तृप्त गात्रांनी थकुन झोपली रात्र ।।४।।
 
शनिवार २४//२०२४ , :५७ PM
अजय सरदेसाई (मेघ)

Friday, 23 February 2024

जाणता अजाणता


 

जुळल्या आपल्या रेशीमगाठी जाणता अजाणता

वाटेत भेटलो अवचित आपण जाणता अजाणता ।।

मनःकोषात जे लपुन ठेवले तुझ्या नी सर्वांपासुनी

उघड झाले गुज ते आता जाणता अजाणता ।।

हृदयांत जे आळवित होतो तुझे प्रेम गीत

ओठांवर तो यमन आला जाणता अजाणता ।।

रोज तुला दुरून न्याहाळून दिवस सरत होते

स्वप्नमार्गे हृदयांत शिरलीस जाणता अजाणता ।। 

मधुगंध तुझा श्वासात दाटला बेधुंद झाली गात्रे  

हळुवार मनांत मोरपंख फिरला जाणता अजाणता ।।

 

शुक्रवार २३//२४ , ११:५० PM

अजय सरदेसाई (मेघ)