प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 19 February 2026

विरोधाभास


आकाशांत मेघ सैरभैर, चौफेर पळत होते,
पाण्याचा थेंबही न पडला, सर्व कोरडेच होते।

हलकेच फुलांवर बसते, मन फुलपाखरू होते,
फुलांच्या अनुरागांतून फूलतात निखारे नुसते।

हातात कुंचला होता, शुभ्र कॅनव्हास पुढ्यात,
कसलीच सक्ती नव्हती, मी सोडला पाण्यात।

रात्र सरली होती, होता हवेत गारवा,
अश्या ह्या प्रहरी मी आळवत होतो मारवा।

ओठांशी येऊन थांबले, ओंजळीभर शब्द होते,
सांगावंसं खूप काही, पण शब्दच फुटत नव्हते।

गूरूवार, १९/२/२६ , ३:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment