दुरदेशीचा पक्षी मी,
दुरुन खूप आलो आहे.
क्षणभर इथे घरटे माझे,
लवकरच प्रस्थान आहे.
आलो कुठुन इथे लक्षात नाही,
जाणार कुठे,ना हे माहीत आहे.
इथे मर्त्य सर्व,फक्त अस्तित्व उरते,
अगणिक रंग त्याचे,एकेक उलगडत आहे.
उन,पाऊस,वारा भोगते ते शरिर,
"मी" कोण? ज्याला न यांचा स्पर्श आहे.
दुःख,विलास,आनंद अनुभवते ते मन,
तो "मी" कोण जो चिदानंद आहे.
हा अहंकार भाव मिथ्या,नव्हे सत्य,
तो "मी" कोण जो याचा सर्वसाक्षी आहे.
सोमवार,
१४/७/२०२५ , ५:४० PM
अजय सरदेसाई - मेघ
No comments:
Post a Comment