प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 14 July 2025

कविता बोलते इथे


 

कविता बोलते इथे,शब्दांचा फक्त खेळ नाही.


सुरावट भिडते हृदयी,वाद्यांचा गोंगाट नाही.


कलाकार भाग कलेचाच,वेगळे अस्तित्व नाही.


शुद्ध प्रतिभा जाज्वल्य,प्रतिमांचा विटाळ नाही.


उधळतात रंग किरणे,मर्यादा कोणत्याच नाही.


अस्तित्व वाहते सर्वत्र,इथे दिशांचे लगाम नाही.


मौन ही बोलके जिथे,तिथे वाचा अनिवार्य नाही.


इंद्रिय विरहीत जाण इथे,शरिराचा हट्ट नाही.


फक्त साक्षी भाव इथे,अनुभवाचे अवसान नाही.


 सोमवार, १४//२०२५ , :५८ PM

अजय सरदेसाई - मेघ

No comments:

Post a Comment