चांदण्यात चिंब भिजून, मिलनाची रात्र आली,
बाहुपाशात तुझ्या सजणा, मी गलित गात्र झाली।
ओठांचा स्पर्श मुलायम, अधरांस झाला जेव्हा,
ज्वाळांच्या उठल्या लाटा,
एक विज कडाडून
गेली।
कानांत तुझं गुणगुणणं, थेट हृदयास भिडलं,
शब्दार्थ लागताच, मला गोड लाज आली।
विकल्प कोणता उरला होता माझ्याकडे रे,
ती गोड मागणी अनामीक, रंध्रारंध्रांने केली।
श्वासा-श्वासातून उसळली,
अग्नीची
उत्क्रांती,
मी विसरून गेली मजला... मी शरण तुला आली।
बुधवार, २३/७/२५, ६:५४ PM
✍ अजय सरदेसाई – ‘मेघ’
No comments:
Post a Comment