प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday, 15 August 2025

बगळ्यांची माळ फुले -२

 


बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात,
ठेविलेस का तू जपून अजून क्षण ते मनात?

तो राजहंस मुग्ध जलतरे डौलात,
तुझेच प्रतिबिंब दिसे मला त्या तळ्यात.

नभातून पडले मोती हिरव्या पानांत,
हार मोत्यांचा तो, तुझ्या शोभला गळ्यात.

रातराणीच्या तारकांनी झाली डाटी निळ्या नभात,
सुगंध तुझा अवचित मिसळला त्या फुलांत.

लखलखती चमचमती ही रात्र भेटीची,
कळले ना संपली कशी,जणु काही क्षणांत.

शुक्रवार १५/८/२५ ,१:३० PM
अजय सरदेसाई -मेघ

Thursday, 14 August 2025

Twilight's Hush


Flocks of cranes still bloom in the amber sky,
Your gentle song through my soul drifts by.
The sunset’s colours have slipped from view,
Yet your fragrant memories softly grew.

 At twilight’s hush, the heavens spread wide,

Blue velvet skies where my dreams abide.
Upon that velvet my dreams took flight,
Vivid thrills awoke in my soul that night.

 

Golden footsteps grace the edge of the west,
Where day fades away into leisurely rest.
In the moon’s soft, silvery embrace,
The night curls warm in its starry place.

 

The moon in fullness stitched beams of light,
Silver threads through the still of night.
My heart’s peacock spread its plume,
Swaying gently in scented bloom.

 

Thursday, 14/8/25 , 12:37 AM
Ajay Sardesai - Megh

 

बगळ्यांची माळ फुले -१


बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात,

गीत तुझे गोतो मी अलवार माझ्या मनात.

 

झाला नजरेआड रवी मावळतीचे रंग उधळुनी,

उतरला गंध तुझ्या आठवांचा अलवार माझ्या मनात.

 

सांजवेळी त्या क्षणी,जणू पसरली मखमल खमात,  

मखमल ती पांघरुनी,उठले रोमांच अंतरात.

 

नभाकाठीं सोनपावलें, दिवस गेला संथ शांत ,

निशाकराच्या मिठीत,कुजबुजली रात्र अंगणात. 

 

मंद चांदणे शिंपीत आला पौर्णिमेचा चंद्र,
मनमोर फुलला हळूवार माझ्या तनात.

 

गुरुवार,१४/८/२५ ,१२:२३ AM

अजय सरदेसाई -मेघ

 

अलवार = अलगद

खमात = आकाशांत

नभाकाठीं = क्षितिजावर

निशाकर = चंद्र


Wednesday, 13 August 2025

Swoop the falcons of day light


How many times have I pleaded in vain,
How many excuses I’ve woven in chain,
How many times, in the silence long,
I’ve sung to myself your only song.

 

You came not then, nor now you appear,

Yet softly I hum when no one is near—

The tune that binds my heart to you,

A melody old, yet ever new.

 

The feeling within my heart beats true,

The same deep current flows in you,

One single flame—yet still apart,

Why must it burn in a broken heart?

 

I see you lean where horizons gleam,

So close in sight, yet still a dream,

Life has turned and closed the door,

Our paths shall meet, perhaps no more.

 

The moonlit night lies still and deep,

The dream-filled night has gone to sleep,

And upon my eyes, with sudden might,

Swoop the falcons of day light.

 

Wednesday, 13 August 2025 – 7:27 PM

Ajay Sardesai – Megh


झेपावले डोळ्यांवर, उजेडाचे ससाणे.


 

कितीदा केल्या विनवण्या,

कितीदा मी केले बहाणे,

कितीदा स्मरून तुला,

मी गायलो तुझेच गाणे.

 

तु न आलिस तेव्हा,

न आहेस तु आता ही,

तरी गुणगुणतो मी,

अजून तुझेच गाणे.

 

भाव जो माझ्या मनांत,

भाव तोच तुझ्या मनांत,

भाव एक, तरीही ,

का हे आपले विरहणे

 

उभी तु क्षितीजास रेलून,

दिसतेस,परी आहेस दूर इथून,

टळले आयुष्यात आता,

तुझे नी माझे भेटणे.

 

निजली चांदण्यांची रात्र,

नुरली ती स्वप्नांची रात्र,

झेपावले डोळ्यांवर,

उजेडाचे ससाणे.

 

बुधवार १३/८/२५ , ७:२७ PM

अजय सरदेसाई -मेघ

Tuesday, 5 August 2025

कोसळत्या धारा,पाऊस वारा


कोसळत्या धारा,पाऊस वारा,

घाली थैमान मनात,

भिजुन साऱ्या,आठवणी आल्या,

घेऊन झोका मनात.

 

इंद्रधनुचे रंग,अंबराचा संग,

नाचला मोर बनात,

थेंब थेंब मोती,भिजवती माती,

टीप टीप लकेर कानात.

 

दरवळला मंद, मातीचा गंध,

सळसळले रोमांच अंगणात,

खळखळते झरे, नागमोडी सारे,

वाहती डोंगरदऱ्यात.

 

मंगळवार, ५/८/२५ , ५:२७ PM

अजय सरदेसाई -मेघ


रमणीय रमणी



रमणीय रमणी अवतरली स्वप्नात,

उठला कल्लोळ माझ्या भवस्वप्नात.

 

ही कोण कुठली,ओळख नाही मजला,

कशी कुठून आली ही अप्सरा स्वप्नात.

 

नजरेत तिच्या लपलेली अगणिक कोडी,

ती सोडविण्यास झालो मी आतुर स्वप्नात.

 

ओठांवरी हास्य आणि चंद्रकिरणांचे गाणे,

उमलले मन माझे जणु कुसुम स्वप्नात.

 

स्पर्शात तिच्या होता मंद वाऱ्याचा गोडवा,

जाईचा सुगंध सर्वत्र दरवळला स्वप्नात.

 

जपले विलक्षण क्षण ते मनाच्या गाभाऱ्यात,

तिच्या गाण्याची लकेर अजुनी माझ्या स्वप्नात.

 

मंगळवार, ५/८/२५ , ४:१४ PM

अजय सरदेसाई -मेघ


फक्त साक्षीभाव उरला


शब्दांच्या भावविश्वात मी सजग फिरून आलो,

सापडले अनेक मोती, कवितेत विखरून आलो.

 

प्रत्येक ओळ माझी,स्फुरतीने तुझ्या फुलते,

तुझ्या धुंद आठवांनी,माझी कविता खुलते.

 

हे स्वप्न असे की हे सत्य,शोधणे सोडून आलो,

विमुक्त या क्षणांत,मी आयुष्य जगून झालो.

 

हा थंड मंद वारा, तुझा गंध घेऊन आला,

कवितेतून माझ्या, मी तुला स्पर्श केला.

 

दोन्ही विश्वातून त्या, मी सहज प्रवास करतो,

सत्य नि मिथ्य जोडणारा,मी एक दुवा ठरतो

 

प्रवाह आयुष्याचा, क्षणातून काळात फिरला,

उरलो न मी देहात — फक्त साक्षीभाव उरला.

 

सोमवार, ४/८/२५, १०:५५ PM

अजय सरदेसाई -मेघ


Monday, 4 August 2025

उरले हाती फक्त बोचरे काटे आठवांचे.

 

प्रित फुलांचे ,हे पाश चांदण्यांचे,

गुंफले अलवार अंतरी,मायाजाळ स्वप्नांचे.

 

तु जवळ नसता,कावरा होतो जीव,

नी तू जवळ असता,गडबडते गणित श्वासांचे.

 

कल्लोळ भावनांचा मन गोंधळून गेला,

न कळे मग मला,करु काय त्या क्षणांचे.

 

हे कूंद भाव विश्व सजवले कुणी मनात,

वाटे तिथेच रहावे,हरपुन भान जगाचे.

 

पायवाट चांदण्यांची ,तरी जपुन ठेव पाय,

पुढे असेल निश्चित रान, निर्बिड आसवांचे.

 

ना ऐकले मनारे,वेड्या का लावलास जिव,

 उरले हाती फक्त बोचरे काटे आठवांचे.

 

सोमवार, ४/७/२५ , ६:५८ PM

अजय सरदेसाई -मेघ

क्षण पुन्हा मिळणार नाही


   

 

मान्य,सौंदर्यास तुझ्या तोड नाही,

प्रेमास माझ्या ही प्रिये,जोड नाही.

 

तो तिरपा कटाक्ष तुझा थेट काळजात रुतला,

म्हणे तुला हृदय घायळ करण्याची,खोड नाही.

 

तुझे स्मित जणू खळखळणारा झरा,

का म्हणतेस उगाच, तू गात नाही.

 

डोळ्यांची भाषा आहे अवगत मला,

का वाटले तुला,मला ते कळणार नाही.

 

चल भेटू चांदण्यात जोवर चंद्र गगनात आहे,

कदाचित हळुवार क्षण हे पुन्हा मिळणार नाही.

 

सोमवार, ४/७/२५ , १२:३० PM

अजय सरदेसाई -मेघ