अर्घ्य दिले सूर्यास निळ्या पहाटे
भगवी रोषणाई पसरली प्राचीस
हविश देऊन तोषविले पितरां
दक्षिणाग्नी पेटला दक्षिण दिशेस
श्रोत्रांत घुमला अनाहताचा नाद
आळवीतो भैरवी कोण पश्चिमेस
तेजस अवासदाग्नी धगधगला
पहा प्रसन्न ते वैश्वदेव उत्तरेस
शक्ती परिवर्तनाची झगमगली
तेज प्रकटले आग्नेय दिशेस
अडथळ्यांचे फोडून डोंगर केली वाट
दगड रिचवले मातीत नैऋत्य दिशेस
भरून उरला श्वासांत सुगंध शीतल
झुळूझुळू वारा वाहे वायव्य दिशेस
त्या परमेश्वरास माझ्या शिरसाष्टांग दंडवत
पहा देवांचे देव महादेव प्रसन्न उभे ईशान्येस
शनिवार , ०६/०७/२०२४ ०४:४० PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment