कितीदा तुज पाहुनी मन माझे झुरावे
कधी तुला गुज माझ्या मनीचे कळावे
का तु समोर येता ओठ माझे मिटावे
का मुखातून माझ्या शब्द ही न फुटावे
का प्रितीच्या फुलाने आपल्या न फुलावे
का फुलण्या आधीच ते कोमेजून जावे
स्वप्नांत अलगद जशी येतेस तू अवचित
आयुष्यात ही माझ्या तू का न तसेच यावे
कितीदा तुझ्या आठवांचे क्षण येता
का डोळ्यांतून माझ्या आसवांनी झरावे
प्रेमात तुझ्या मिळाले फक्त दुःख पदरी
का तरीही मी वेदनेस या बिलगून राहावे
गुरुवार १८/७/२०२४ , ११:०६ PM
अजय सरदेसाई (मेघ)
(Inspired from the song "कितीदा नव्याने तुला" from the marathi movie "ती सध्या काय करते")
No comments:
Post a Comment