शारदे, कवितेस माझ्या प्राण दे,
शब्दांना माझ्या रसवृष्टीचे वरदान दे।
श माझे थेट हृदयास भिडू दे,
शारदे, शब्द-शक्तीचे ऐसे दान दे।
भाषेवर प्रभुत्व दे, शब्दांवर पकड दे,
काव्य लयबद्ध राहो, त्यास योग्य छंद दे।
वाणीतून स्वर अनायास वाहू दे,
कंठात मकरंद नित्य राहू दे।
श्रोत्र नि श्रोते तृप्त व्हावेत,
ऐसे दिव्य सुर तू मज वाण दे।
शनिवार, २४/१/२६ , ४:०५ PM
अजय सरदेसाई -मेघ