मतला
शब्द माझेच होते, पण अर्थ बदलून गेले
तू गप्प राहिलीस, वादच विरून गेले
खूप काही सांगायचं होतं, ओठांवरच राहून गेले
डोळ्यांत पाहिलं तुझ्या, नि शब्द परतून गेले
मी डोळ्यांत शोधत राहिलो स्वतःची ओळख जुनी
तुझ्या एका नजरेत सगळे प्रश्न गळून गेले
वेळेच्या प्रवाहात सर्व काही वाहून गेले
माझ्याच पाऊलखुणांचे मार्ग बदलून गेले
शांततेने शिकवलं तू किती मोठं असतं मौन
जळजळीत शब्द सारे हळूहळू जळून गेले
मक्ता
मेघ म्हणे — सावलीसारखं नातं होतं आपलं
प्रकाशात दोघेही वेगळे दिसून गेले
शुक्रवार, १६/१/२६ , ०२:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ
No comments:
Post a Comment