प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 6 September 2025

🎼 मराठी ग़ज़ल : छटा वेगळ्या


मतला:

मजकूर तोच, छटा वेगळ्या।

साध्य तेच, तर्‍हा वेगळ्या।।

 

शेर २:

गुलाब सारेच सुवास भरती।

पाकळ्यांच्या छटा वेगळ्या।। 

 

शेर ३:

जीवन चक्राच्या आऱ्यांतून । 

सुख-दु:खांच्या कथा वेगळ्या।।

 

शेर ४:

आभाळ तेच, तारे तेचि।

तारकांच्या दशा वेगळ्या।।

 

शेर ५:

धर्म एक, जगी 'आदर' तो।

धर्माचरणी कथा वेगळ्या।।

 

मकता:

मेघ’ जाणतो सत्य एकच।

लोकांच्या परिभाषा वेगळ्या।।

 

शुक्रवार,५/९/२५ , २:५२ PM

अजय सरदेसाई -मेघ


No comments:

Post a Comment